पुणे: ट्रिनिटी इंजिनिअरींग व इंजिन इनसाईट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने आयोजित अव्हेरनेस क्लब क्रिकेट करंडक स्पर्धेत अं
के.जे इन्स्टिटयूट, पुणे येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीच्या लढतीत डीटीडीसी स्ट्रायकर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा खेळताना डीटीडीसी स्ट्रायकर्स संघाने २०षटकात ९गड्यांच्या बदल्यात १३९धावा केल्या. यात अझिम काझी ३१, अतुल विटकर २७, नौशाद शेख २४यांनी छोटी पण महत्वपूर्ण खेळी करत संघाला १३९धावापर्यंत मजल गाठून दिली. पुणे सिटी पोलीसच्या अमेय श्रीखंडे(२८-३),अमर साळवी(१७-२), पृथ्वीराज गायकवाड(३४-२)यांनी सुरेख गोलंदाजी केली. १३९धावांचे आव्हान पुणे सिटी पोलीस संघाला पेलवले नाही. त्यांचा डाव १७.३षटकात ११४धावावर संपुष्टात आला. यामध्ये विपुल गायकवाड ४२(४०), अमेय श्रीखंडे १७यांनी थोडासा प्रतिकार केला. डीटीडीसी स्ट्रायकर्सकडून आतिफ सय्यदने २७धावात ५गडी बाद करून निम्मा संघ तंबूत धाडला. आतिफला संकेत चव्हाणने १८धावात २गडी बाद करून सुरेख साथ दिली. सामन्याचा मानकरी आतिफ सय्यद ठरला.
स्पर्धेतील विजेत्या डीटीडीसी स्ट्रायकर्स संघाला ४५हजार रुपये व करंडक, तर उपविजेत्या पुणे सिटी पोलीस संघाला ३०हजार रुपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण के.जे. एज्युकेशनल इन्सिट्यूटसचे अध्यक्ष कल्याण जाधव, केजीईआयचे संचालक डॉ.हेमंत अभ्यंकर, ट्रिनिटी इंजिनिअरींगचे मुख्याध्यापक डॉ.प्रकाश डबीर आणि जयंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
डीटीडीसी स्ट्रायकर्स: २०षटकात ९बाद १३९धावा(अझिम काझी ३१(२४), अतुल विटकर २७(२८), नौशाद शेख २४(१९), अमेय श्रीखंडे ४-२८-३, अमर साळवी ३-१७-२, पृथ्वीराज गायकवाड ३-३४-२)वि.वि.पुणे सिटी पोलीस: १७.३षटकात सर्वबाद ११४धावा(विपुल गायकवाड ४२(४०), अमेय श्रीखंडे १७(१६), आतिफ सय्यद ३.३-२७-५, संकेत चव्हाण ४-१८-२);सामनावीर-आतिफ सय्यद; डीटीडीसी स्ट्रायकर्स संघ २५ धावांनी विजयी;
इतर पारितोषिके:
मालिकावीर: आतिफ सय्यद
सर्वोत्कृष्ट फलंदाज: अमरनाथ लोणकर(२२२धावा)
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: लौकिक सूर्यवंशी(१२विकेट)