पुणे– आयडीयाज् अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ 14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2017-18 स्पर्धेत
पुना क्लब क्रिकेट मैदान व पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत शुभम तिवारीच्या 48 धावांच्या बळावर टेक महिंद्रा संघाने स्प्रिंगर नेचर संघाचा 19 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना टेक महिंद्रा संघाने 20 षटकात 7 बाद 147 धावा केल्या. साकेत देशमुखने 32 धावा करून शुभमला सुरेख साथ दिली. 147 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विशाल होलेने नाबाद 49 धावा संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत व स्प्रिंगर नेचर संघाचा डाव 20 षटकात 8 बाद 128 धावांत रोखला. शुभम तिवारी सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत उमेश तोमरच्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर टिएटो संघाने हर्मन संघाचा 7 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना उमेश तोमर व रोहित उपाध्याय यांच्या अचूक गोलंदाजीपुढे हर्मन संघ 20 षटकात 9 बाद 101 धावांत गोरद झाला. उमेश तोमर व रोहित उपाध्याय यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. 101 धावांचे लक्ष टिएटो संघाने केवळ 14.5 षटकात 3 बाद 102 धावांसह सहज पुर्ण केले. यात स्वप्निल उपाध्येने नाबाद 41 तर इमतियाझ शेखने 47 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. उमेश तोमर सामनावीर ठरला.
तिस-या सामन्यात संघर्षपुर्ण लढतीत स्वानंद भागवतच्या दमदार नाबाद शतकी खेळीच्या बळावर व्हेरिटास संघाने टीसीएस 4 धावांनी पराभव केला. 156 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीसीएस संघाने 20 षटकात 6 बाद 152 धावा केल्या. यात सौम्य मेहंतीने 69 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. स्वानंद भागवत सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
टेक महिंद्रा- 20 षटकात 7 बाद 147 धावा(साकेत देशमुख 32, शुभम तिवारी 48, सयेद जावेद नाबाद 26, वसिम अख्तर 2-23) वि.वि स्प्रिंगर नेचर- 20 षटकात 8 बाद 128 धावा(राहूल नगाडे 26, विशाल होले नाबाद 49, गुरप्रीत सिंग 2-16) सामनावीर- शुभम तिवारी
टेक महिंद्रा संघाने 19 धावांनी सामना जिंंकला.
हर्मन- 20 षटकात 9 बाद 101 धावा(नवनीत उपाध्ये 25, अभिजित केकणे 23, उमेश तोमर 3-17, रोहित उपाध्याय 3-23) पराभूत वि टिएटो- 14.5 षटकात 3 बाद 102 धावा(स्वप्निल उपाध्ये नाबाद 41, इमतियाझ शेख 47, हेमंत परळकर 2-25) सामनावीर- उमेश तोमर
टिएटो संघाने 7 गडी राखून सामना जिंकला.
व्हेरिटास- 20 षटकात 7 बाद 156 धावा(स्वानंद भागवत नाबाद 103, राहूल खंडेलवाल 2-29) वि.वि टीसीएस- 20 षटकात 6 बाद 152 धावा(शंतनू नाडकर्णी 39, सौम्य मेहंती 69, अमृत अलोक 3-13) सामनावीर- स्वानंद भागवत
व्हेरिटास संघाने 4 धावांनी सामना जिंकला.