पुणे,– आयडीयाज् अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ 14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2017-18 स्पर्धेत
पुना क्लब क्रिकेट मैदान व पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत चिन्मय मालवणकरच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर अॅटॉस् संघाने आय-प्लेस संघाचा 74 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना अॅटॉस् संघाने 20 षटकात 6 बाद 188 धावा केल्या. 188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हर्षद तिडके, शौर्य शर्मा व वैभव पेडणेकर यांच्या अचूक गोलंदाजीपुढे आय-प्लेस संघ केवळ 16.5 षटकात सर्वबाद 114 धावांत गोरद झाला. हर्षद तिडकेने 31 धावात 3 गडी बाद करत संघाला विजय मिळवून दिला. चिन्मय मालवणकर सामनावीर ठरला.
दुस-या सामन्यात प्रतीक पंडीतच्या अफलातून दोलंदाजीच्या जोरावर सायबेज संघाने टॅलेंटीका संघाचा 9 गडी राखून दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना राहूल पांडे, निखिल गिराडे व प्रतीक पंडीत यांच्या अचूक गोलंदाजीपुढे टॅलेंटीका संघ केवळ 18.4 षटकात सर्वबेद 89 धावांत दारद झाला. 89 धावांचे लक्ष आदित्य सोनीच्या नाबाद 27 व सौरभ रावळच्या 37 धावांसह सायबेज संघाने अवघ्या 11.2 षटकात 1 गडी गमावत 90 धावा करून सहज पुर्ण केले. प्रतीक पंडीत सामनावीर ठरला.
तिस-या लढतीत राहूल गायकवाडच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर सिमेंस संघाने विप्रो संघाचा 7 गडी राखून पराभव केला. विप्रो संघाने विशाल हिरगुडेच्या 45 धावांसह 20 षटकात 9 बाद 130 धावा केल्या. सिमेंस संघाकडून राहूल गायकवाडने 3 तर लतीश जामदार व संजय पाटील यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. 130 धावांचे लक्ष विशाल रैनाच्या नाबाद 46 धावांसह सिमेंस संघाने 18 षटकात 3 बाद 131 धावांसह पुर्ण करत विजय मिळवला. राहूल गायकवाड सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
अॅटॉस्- 20 षटकात 6 बाद 188 धावा(चिन्मय मालवणकर नाबाद 57, वैभव पेडणेकर 22, निखिल पाटील 24, महेश भोसले 30, विघ्नेश मोहन नाबाद 23, आकाश कनोजीया 2-32, झिशान अन्सारी 2-27) वि.वि आय-प्लेस- 16.5 षटकात सर्वबाद 114 धावा(श्रिकांत शेवाळे 23, आकाश कनोजीया नाबाद 21, हर्षद तिडके 3-31, शौर्य शर्मा 2-6, वैभव पेडणेकर 2-16) सामनावीर- चिन्मय मालवणकर
अॅटॉस् संघाने 74 धावांनी सामना जिंकला.
टॅलेंटीका- 18.4 षटकात सर्वबेद 89 धावा(वसीफ काझमी 21, राहूल कुलकर्णी 31, राहूल पांडे 2-13, निखिल गिराडे 2-12, प्रतीक पंडीत 3-13) पराभूत वि सायबेज- 11.2 षटकात 1 बाद 90 धावा(आदित्य सोनी नाबाद 27, सौरभ रावळ 37) सामनावीर- प्रतीक पंडीत
सायबेज संघाने 9 गडी राखून सामना जिंकला.
विप्रो- 20 षटकात 9 बाद 130 धावा(रवीकिरण बायड 21, विशाल हिरगुडे 45, राहूल गायकवाड 3-17, लतीश जामदार 2-27, संजय पाटील 2-27) पराभूत वी सिमेंस- 18 षटकात 3 बाद 131 धावा(तुषार अत्तर्डे 21, अतूल पवार 39, विशाल रैना नाबाद 46, अरविंद वर्मा 2-15) सामनावीर- राहूल गायकवाड
सिमेंस संघाने 7 गडी राखून सामना जिंकला.



