पुणे: पूना फुटबॉल लीगच्या पहिल्या सत्राच्या अभूतपूर्व यशामुळे अत्यंत आनंद झालेल्या पूना क्लबच्या सभासदांनी अशा प्रकारच्या अनेक क्रीडा स्पर्धा घेण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. तसेच, सभासदांच्या याच उत्सचहाचा परिणाम म्हणून पूना क्लब तर्फे दुसऱ्या पूना क्लब फुटबॉल लीग(पीसीएफएल) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पूना क्लब येथील मैदानावर 14 ते 17 डिसेंबर 2017 या कालावधीत रंगणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना पुना क्लबचे स्पोर्टस चेअरमन व फुटबॉल विभागाचे सचिव मनीष मेहता व स्पर्धा संचालक तारिक परवानी यांनी सांगितले कि, हि फुटबॉल लीग स्पर्धा केवळ क्लबच्या सभासदांसाठीच मर्यादित आहे. स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी मानद सचिव मनीष मेहता, प्रायोजकत्व व केटरिंगचे मुख्य सुनील हांडा, स्पर्धा संचालक तारिक परवानी, तांत्रिक संचालक उमेश पिल्ले, तांत्रिक व क्रिएटिव्ह सपोर्टचे तुषार आस्वानी, स्पॉन्सरशीप टीमचे अँड्री पिंटो, स्पर्धा व्यवस्थापक पवित पठेजा यांचा समावेश आहे. तसेच, सभासंदाच्या समितीमध्ये पूना क्लब लिमिटेडचे अध्यक्ष राजीव संगतानी, क्लबचे उपाध्यक्ष राहुल ढोले पाटील, सिस्टीम व आयटीचे चेअरमन गौरव गढोके, क्लबच्या केटरिंग व स्पॉन्सरशीपचे चेअरमन सुनील हांडा, लॉ कमिटीचे चेअरमन रोहन पुसाळकर यांचा समावेश आहे.
स्पर्धेत झाल्टन ऑफ स्विंग(गौरव गढोके व मनप्रीत उप्पल), गेट मेस्सी(हरसिह सोळंकी), आऊट ऑन बेल(पवित पठेजा व अमित पोकर्णा), रोनाल्डो नट्स(अमित गढोके), रॉनी ट्यून्स(राकेश नवनी), सुअरेज बाईट्स(नितीन लुंकड व अमित कोठारी), मार्क ओ पिर्लो(अमजद अक्कलकोटकर व अँड्री पिंटो), ऍबसुलेटली फॅब्रिगेस(मनीष मेहता व प्रणय धारणीधारका), ड्युक्स ऑफ हजार्ड(अली हाजी), शुगर केन(चिराग लुल्ला व अर्णव लुल्ला), कोक इन कॅन(नीरज अरोरा व विशाल कस्तीया), विझार्ड ऑफ ओझील(अमर सेंभे) हे 12 संघ झुंजणार आहेत.
या सपर्धेला नील हुंडाईचे अक्षय शाह यांचे सहप्रायोजकत्व लाभले आहे. या स्पर्धेत एकूण 12 संघ असून प्रत्येक संघात 8 खेळाडूंचा समावेश आहे. तसेच, हि 5-अ-साईड स्पर्धा असून 3 खेळाडू राखीव असणार आहेत. सामन्याचा पूर्वार्ध व उत्तरार्ध प्रत्येक 12.30मिनिटांचा असून तीन मिनिटांचे मध्यंतर असणार आहे. प्रत्त्येक संघात 1 मालक व 1 सहमालक असे दोन खेळाडूंची परवानगी आहे. इतर खेळाडू 22 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या लिलाव प्रक्रियेतून निवडले जाणार आहेत. हि संपूंर्ण स्पर्धा व्यावसायिक पंच व तांत्रिक अधिकाऱ्यांकडून संचालित केली जाणार आहे. या स्पर्धेबरोबरच मुले व प्रौढांसाठी अन्य करमणुकीचे कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत. तसेच, महिलांच्या प्रदर्शनीय सामन्याचेही अखेरच्या दिवशी आयोजन केले जाणार आहे.
कार्यकारिणी सदस्यांसाठीही एका सामन्याचे आयोजन केले जाणार आहे. अल्पोपहार, खाद्यपेय, डीजे म्युजिक व लाईव्ह कॉमेंटरी, यामुळे स्पर्धेच्या ठिकाणी फुटबॉल महोत्सवाचे च वातावरण निर्माण करण्याचा आयोजकांचा हेतू आहे.