पुणे-सेंट पॅट्रिक हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज संघाने रिलायंस फाऊंडशेन युथ स्पोर्ट्स फुटबॉल स्पर्धेत रविवारी झालेल्या मुलांच्या सिनियर गटातील सामन्यात सेंट व्हिन्सेंट नाईट कॉलेज संघ अनुपस्थित राहिल्याने उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली.या निकालामुळे क गटात सात गुण (दोन विजय आणि एक ड्रॉ) मिळवत शेवटच्या आठ जणांमध्ये स्थान मिळवले.
मुलांच्या कॉलेज गटात ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी (एआयएसएसएमएस)कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संघाने इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड इंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट ( आयएमइडी) संघाला 5-0 असा पराभव केला.
दुर्गेश शुक्ला (तिसऱ्या मिनिटाला) आणि प्रणव भंडारी (10 व्या मिनिटाला) यांनी एआयएसएसएमएस संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या फेरीत दुर्गेश आणि प्रणव यांनी अनुक्रमे 48 व्या व 53 व्या मिनिटाला गोल मारले.यानंतर एआयएसएसएमएस कॉलेजकडून अनिकेत भिकुलेने 55 व्या मिनिटाला गोल मारत संघाचा विजय निश्चित केला.
मुलांच्या कॉलेज गटातील श्री शिवाजी प्रिपेरेटरी मिलिटरी डे स्कुल अँड ज्युनियर कॉलेज ग्राऊंडवर झालेल्या सामन्यात निवृत्ती बाबाजी नेवाले (एनबीएन) सिंहगड स्कुल ऑफ इंजिनिअरिंग संघाने झिल एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संघाला 5-0 असा पराभव केला.शुभम किरवेने (चौथ्या, 28 व्या व 30 व्या मिनिटाला) तीन गोल मारले तर, निशांत नदार (14 व्या व 37 व्या मिनिटाला) याने दोन गोल मारले.
नंतर सूर्यदत्ता ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स संघाने नवरोसजी वाडिया कॉलेजला मुलांच्या सिनियर गटात 1-0 असा विजय नोंदवला.सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला गौरव रेवणकर याने एकमात्र गोल मारला.
द बिशप्स को एड स्कूल संघाने आरनॉल्ड सेंट्रल स्कुल संघाला 4-1 असा ज्युनियर लीग गटातील सामन्यात विजय नोंदवला.देव राव (17 व्या मिनिटाला), अर्जुन जाकथ (32 व्या मिनिटाला), रोहन चीरौथ (47 व्या मिनिटाला) आणि सौरभ रत्नपारखी (48 व्या मिनिटाला) गोल मारत विजयात योगदान दिले. पराभूत संघाकडून एकमात्र गोल हा सिद्धांत चव्हाणने (27 व्या मिनिटाला) मारला.
लीग निकाल :
ज्युनियर मुले : एफ गट – द बिशप्स को एड स्कूल वि. वि. आरनॉल्ड सेंट्रल स्कुल 4-1
– सिनियर मुले : सूर्यदत्ता ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स वि. वि.नवरोसजी वाडिया कॉलेज 1-0, क गट : सेंट पॅट्रिक हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वोकोव्हर सेंट व्हिन्सेंट नाईट कॉलेज
– कॉलेज मुले : ग्रुप ई : एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वि. वि.इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड इंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट( आयएमइडी) 5-0, ड गट : एनबीएन सिंहगड स्कूल ऑफ इंजिनिअरिंग वि. वि. झिल एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 5-0