Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कांची प्रोपर्टीज्, डीटीडीसी स्ट्रायकर्स, सिध्दी क्रिकेट क्लब संघाची आगेकुच

Date:

पुणे: ट्रिनिटी इंजिनिअरींग व इंजिन इनसाईट  प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने आयोजित अव्हेरनेस क्लब क्रिकेट करंडक स्पर्धेत कांची प्रोपर्टीज्, डीटीडीसी स्ट्रायकर्स व सिध्दी क्रिकेट क्लब संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

के.जे इन्स्टिटयूट, पुणे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत  प्रतिक शेलारच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर कांची प्रोपर्टीज् संघाने सिम एन् विलो संघाच 11 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना स्वप्निल कुलकर्णीच्या 30 व तुणाल पायगुडेच्या 25 धावांच्या बळावर कांची प्रोपर्टीज् संघाने 19.1 षटकात सर्वबाद 125 धावा केल्या. 125 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना प्रतिक शेलार  व निहार राज्यगुरू  यांच्या अचूक गोलंदाजीने सिम एन् विलो संघाचा डाव 20 षटकात सर्वबाद 114 धावात रोखला.  प्रतिक शेलार सामनावीर ठरला.

दुस-या लढतीत समिर मोमीनच्या अफलातीन गोलंदाजीच्या जोरावर डीटीडीसी स्ट्रायकर्स संघाने इलेव्हन अॅक्सेस संघाचा 4 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना इलेव्हन अॅक्सेस संघाने 20 षटकात 9 बाद 102 धावा केल्या. यात हिकांत कंदारने 24 तर निखिल पांड्याने 25 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. डीटीडीसी स्ट्रायकर्स संघाकडून समिर मोमीनने केवळ 14 धावा देत 5 गडी बाद केले. 102 धावांचे लक्ष डीटीडीसी स्ट्रायकर्स संघाने केवळ 16.3 षटकात 6 बाद 103 धावा करून पुर्ण केले. यात अतिफ सय्यदने 23 तर महेश शिंदेने 19 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. समिर मोमीन सामनावीर ठरला.

शेवटच्या लढतीत सुजय इनामदारच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सिध्दी क्रिकेट क्लब संघाने शिवतेज क्रिकेट क्लब संघाचा 5 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना शिवतेज क्रिकेट क्लब संघाचा डाव 19.2 षटकात सर्वबाद 137 धावांत रोखला. यात गणेश पायगुडेने 34 धावा केल्या. सिध्दी क्रिकेट क्लब संघाकडून निखिल कोंढारे, स्वप्निल कुलकर्णी व सुजय इनामदार यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. 137 धावांचे लक्ष सिध्दी क्रिकेट क्लब संघाने केवळ 16.2 षटकात 5 बाद 138 धावांत सहज पुर्ण केले. यात शिवप्रताप सिंगने 24 चेंडूत 48 तर  सुजय इनामदारने 33 चेंडूत 46 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. सुजय इनामदार सामनावीर ठरला

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी

कांची प्रोपर्टीज्- 19.1 षटकात सर्वबाद 125 धावा(स्वप्निल कुलकर्णी 30, तुणाल पायगुडे 25, निरज यादव 18, हेमंत सुर्यवंशी 3-34, अखिलेश उबाळे 2-9) वि.वि सिम एन् विलो- 20 षटकात सर्वबाद 114 धावा(ललित सोमनाथ 35, इशान शर्मा 18, अमृत धांडेकर 17, प्रतिक शेलार 4-25, निहार राज्यगुरू 2-30) सामनावीर- प्रतिक शेलार

कांची प्रोपर्टीज् संघाने 11 धावांनी सामना जिंकला. 

इलेव्हन अॅक्सेस- 20 षटकात 9 बाद 102 धावा(हिकांत कंदार 24, निखिल पांड्या 25, साजन मोदी 21, समिर मोमीन 5-14, दिपक बोरा 2-17, संकेत चव्हाण 1-10) पराभूत वि डीटीडीसी स्ट्रायकर्स- 16.3 षटकात 6 बाद 103 धावा(अतिफ सय्यद 23, महेश शिंदे 19, हिकांत कंदार 3-21, सनी मारवाडी 2-18, नितेश पटेल 1-18) सामनावीर- समिर मोमीन

डीटीडीसी स्ट्रायकर्स संघाने 4 गडी राखून सामना जिंकला.

शिवतेज क्रिकेट क्लब- 19.2 षटकात सर्वबाद 137 धावा(गणेश पायगुडे 34, रवी पवार 22, अजय नव्हले 22, निखिल कोंढारे 2-14, स्वप्निल कुलकर्णी 2-27, सुजय इनामदार 2-28) पराभूत वि सिध्दी क्रिकेट क्लब- 16.2 षटकात 5 बाद 138 धावा(शिवप्रताप सिंग 48(24), सुजय इनामदार 46(33), विनित मडकाइकर 22, रवी पवार 3-21, राजेश सुतार 1-15) सामनावीर- सुजय इनामदार

सिध्दी क्रिकेट क्लब संघाने 5 गडी राखून सामना जिंकला. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन

“समानता, न्याय आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी...

पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा

बीसीसीआय स्टॅंडर्डसह देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप सुरू पुणे...

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...