पुणे, दि.15 नोव्हेंबर 2017- एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या साकेत मायनेनी, युकी भांब्री, रामकुमार रामनाथन या भारतीय खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत जागतीक क्रमवारीत 140व्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या युकी भांब्री याने पावकीकचा 6-4, 7-6(7-4)असा पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. हा सामना1तास 26मिनिटे चालला. 35मिनिटे चाललेल्या सामन्यात पहिल्या सेटमध्ये युकीने सुरेख सुरुवात करत तिसऱ्या गेममध्ये पावकीकची सर्व्हिस रोखली व त्यानंतर आपली आघाडी कायम ठेवत 10व्या गेममध्ये स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-4असा जिंकून सामन्यात आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये पावकीकने अधिक भक्कम सुरुवात दुसऱ्या गेममध्ये युकीची सर्व्हिस रोखली व सामन्यात 3-0आघडी घेतली. पण युकीने जबरदस्त कमबॅक करत पाचव्या गेममध्ये पावकीकची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत 3-3अशी बरोबरी साधली. 12व्या गेमपर्यंत दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सामना टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये युकीने आपला अनुभव व कौशल्याचा वापर करत सहाव्या, नवव्या गेममध्ये पावकीकची सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 7-6(7-4)असा जिंकून उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
भारताच्या साकेत मायनेनीने सर्बियाच्या जागतीक क्रमवारीत 216वा असणा-या आठव्या मानांकीत पेदजा क्रिस्टीन याचा 4-6, 6-2, 6-0 असा पराभवाचा धक्का देत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. भारताच्या रामकुमार रामनाथन याने आपली विजयी मालिका कायम ठेवत ग्रेट ब्रिटनच्या ब्रीडन क्लेन याचा टायब्रेकमध्ये 7-6(9-7), 6-3 असा पराभव करून दिमाखात उपांत्यपुर्व गाठली. हा सामना 1तास 35मिनिटे चालला. सामन्यात सुरुवातीला बी. क्लेन याने वर्चस्व राखत रामकुमारची पाचव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व 3-2अशी आघाडी घेतली. पिछाडीवर असलेल्या रामकुमार याने वेगवान खेळ करत क्लेनची 10व्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व 5-5अशी बरोबरी साधली. 12व्या गेमपर्यंत दोघांनी आपापल्या सर्व्हिस राखल्यामुळे हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये 15व्या गेममध्ये क्लेन याने डबल फॉल्ट केला व याचाच फायदा घेत पुढील एक गेम जिंकून हा सेट 7-6(9-7)अशा फरकाने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये रामकुमार याने वरचढ खेळ करत क्लेनची पहिल्या, तिसऱ्या, नवव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-3 जिंकून विजय मिळवला.
जागतीक क्रमवारीत 130वा असणा-या स्पेनच्या दुस-या मानांकीत ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास याने भारताच्या सुमित नागलचा 6-3, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला, तर कझाकस्तानच्या नवव्या मानांकीत अलेक्झांडर नेदोव्हेसेव याने भारताच्या एन.श्रीराम बालाजी याचा 5-7, 6-4, 7-5 असा तीन संटमध्ये पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
दुहेरी गटात ग्रेट ब्रिटनच्या स्कॉट क्लायटोन व जॉनी ओमार या जोडीने क्रोटायाच्या इवान साबानोव व मतेजा साबानोव यांचा 6-2, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल-एकेरी गट-दुसरी फेरी
साकेत मायनेनी(भारत) वि.वि पेदजा क्रिस्टीन(सर्बिया,8) 4-6, 6-2, 6-0
निकोला मिलाजेविक(सर्बिया,5) वि.वि हुगो ग्रेनिअर(फ्रांस)7-5, 6-3
जे क्लार्क(ग्रेट ब्रिटन) वि.वि इवान किंग(अमेरीका,7) 6-3, 6-4
ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास(स्पेन,2) वि.वि सुमित नागल(भारत) 6-3, 6-4
अलेक्झांडर नेदोव्हेसेव(कझाकस्तान,9) वि.वि एन.श्रीराम बालाजी(भारत) 5-7, 6-4, 7-5
युकी भांब्री(भारत,3) वि.वि अॅन्ट पावीक(क्रोटाया) 6-4, 7-6
रामकुमार रामनाथन(भारत)वि.वि.ब्रीडन क्लेन(ग्रेट ब्रिटन)7-6(9-7), 6-3;
दुहेरी गट- पहिली फेरी
स्कॉट क्लायटोन(ग्रेट ब्रिटन)/जॉनी ओमार(4) (ग्रेट ब्रिटन) वि.वि तिमुर खाबिबुलीन(कझाकस्तान)/ अलेक्झांडर नेदोव्हेसेव(कझाकस्तान) 6-3, 4-6, 10-8
पेद्रो मार्टिनेझ(स्पेन)/ ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास (स्पेन)वि.वि जॉफ्रि ब्लॅंकान्यूक्स(फ्रांस)/ जे क्लार्क(ग्रेट ब्रिटन) 6-7, 6-3, 10-8
इवान साबानोव(क्रोटाया)/मतेजा साबानोव(क्रोटाया) वि.वि अर्जुन कढे(भारत)/ एन.विजय सुंदर प्रशांत(भारत) 6-3, 7-5
दुहेरी गट-उपांत्यपुर्व फेरी-
स्कॉट क्लायटोन(ग्रेट ब्रिटन)/जॉनी ओमार(4)(ग्रेट ब्रिटन) वि.वि इवान साबानोव(क्रोटाया)/मतेजा साबानोव(क्रोटाया) 6-2, 6-4