पुणे- कारा इंटलेक्ट यांच्या व्यवस्थापन आणि संकल्पनेतून व पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित इंडो शॉटले पीपीएल क्रिकेट 2017 स्पर्धेत रोहन दामले(92धावा)याच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर टायगर्स संघाने एनएच वुल्स संघाचा 60धावांनी दारुण पराभव करत विजेतेपद संपादन केले.
पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीच्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना टायगर्स संघाने 6षटकात बिनबाद 110धावांचा डोंगर उभा केला. यात रोहन दामलेने 26 चेंडूत 3चौकार व 11 षटकारांच्या मदतीने नाबाद 92 धावांची तडाखेबंद खेळी केली. रोहन दामलेला अभिषेक ताम्हाणेने नाबाद 13 धावा करून सुरेख साथ दिली. रोहन दामले(92धावा) व अभिषेक ताम्हाणे(13धावा) या सलामीच्या जोडीने 36 चेंडूत 110 धावांची भागीदारी केली. 110धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या एनएच वुल्स संघाला हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा डाव 6षटकात 3बाद 50धावावर गारद झाला. यात अभिषेक परमार 16, नाहुश जाधव 15, प्रशांत वैद्य 11यांनी थोडासा प्रतिकार केला. टायगर्सकडून अभिषेक ताम्हाणे(1-2), प्रतीक वांगीकर(1-2), अभिषेक गोडबोले(1-15) यांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामनावीर हा ‘किताब रोहन दामले याला देण्यात आला.
महिला गटात अंतिम फेरीच्या सामन्यात प्रीती मराठेच्या उपयुक्त 25धावांच्या जोरावर पिंक संघाने ब्लु संघाचा 17धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या संघाला स्वर्गीय ज्ञानेश्वर आगाशे करंडक प्रदान करण्यात आला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण इंडो शॉटलेचे अनिल जलिहाल, इंडो शॉटलेचे संचालक अशोक बेहेरे, पीवायसी हिंदू जिमखाना क्लबचे अध्यक्ष विजय भावे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबचे मानद सचिव कुमार ताम्हाणे, क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव राजू भालेकर, ब्रिहंसचे मंदार आगाशे, होडेकचे अभिजित खानविलकर, एमसीएचे अध्यक्ष अभय आपटे, कारा इंटलेक्टचे रणजित पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
टायगर्स: 6षटकात बिनबाद 110धावा(रोहन दामले नाबाद 92(26, 3चौकार, 11षटकार), अभिषेक ताम्हाणे 13(12, 1षटकार)वि.वि. एनएच वुल्स: 6षटकात 3बाद 50धावा(अभिषेक परमार 16(7, 2षटकार), नाहुश जाधव 15( 6, 2षटकार), प्रशांत वैद्य 11(14, 1षटकार), अभिषेक ताम्हाणे 1-2, प्रतीक वांगीकर 1-2, अभिषेक गोडबोले 1-15);सामनावीर-रोहन दामले.
महिला गट:
पिंक संघ: 6षटकात 3बाद 55धावा(प्रीती मराठे नाबाद 25(15, 4चौकार), भाग्यश्री देशपांडे नाबाद 15(10, 2चौकार), दीप्ती सरदेसाई 3) वि.वि. ब्लु संघ: 6षटकात 3बाद 28धावा(अंकिता 12(9, 1चौकार), साधना नाबाद 9(6, 1चौकार), दीप्ती सरदेसाई 1-1); सामनावीर-प्रीती मराठे.
इतर पारितोषिके
सर्वोत्कृष्ट फलंदाज: अभिषेक परमार(236धावा)
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: अभिषेक ताम्हणे(8विकेट्स)
मालिकावीर: रोहन दामले(321 धावा)
मोस्ट डिसिप्लिन टीम: जेपी शार्कस;
मोस्ट स्पोर्टींग टीम: रेड बुल्स;
मोस्ट व्हॅल्युएबल सिनिअर प्लेयर:विक्रांत पाटील;
मोस्ट व्हॅल्युएबल ज्युनिअर प्लेयर: नील हळबे;
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक: आशिष राठी;
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक: मनिष साबडे;
मोस्ट इम्पॅक्ट प्लेयर: श्रेयश वर्तक((203धावा, 4विकेट्स)