सृजन सुपर 20 युथ कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत महाराणा क्रीडा युवा,बारामती स्पोर्टस् अकादमी संघांचा अंतिम फेरीत प्रवेश
पुणे,दि 13 नोव्हेंबर 2017- एक्सेलार स्पोर्टस् अॅड एन्टरटेमेंट प्रायव्हेट लिमिटेड व पुणे जिल्हा कबड्डी संघटना यांच्या सहकार्याने ओयोजित सृजन सुपर 20 युथ कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत बारामती विभागात
महाराणा क्रीडा युवा संघाने राजे उमाजी नाईक क्रीडा मंडळ संघाचा तर बारामती स्पोर्टस् अकादमी संघाने आर.एस.एफ सासवड संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
क्रीडा संकुल, बारामती येथे सुरू असलेल्या बारामती विभागातील मुलाांच्या गटात महाराणा क्रीडा युवा संघाने राजे उमाजी नाईक क्रीडा मंडळ संघाचा 23-8 असा तर बारामती स्पोर्टस् अकादमी संघाने आर.एस.एफ सासवड संघाचा 23-22 चूरशीच्या लढतीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
महाराणा क्रीडा युवा संघ व बारामती स्पोर्टस् अकादमी या संघाची 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी बारामती येथे होणा-या सुपर प्लेऑफ सामन्यांसाठी निवड
स्पर्धेचा सविस्तर निकाल- मुले- उपांत्य फेरी
महाराणा क्रीडा युवा संघ- 23 वि.वि राजे उमाजी नाईक क्रीडा मंडळ-8
बारामती स्पोर्टस् अकादमी- 23 वि.वि आर.एस.एफ सासवड- 22