केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धा
भारताच्या सिद्धार्थ रावत, एन. विजय सुंदर प्रशांत यांचे आव्हान संपुष्टात
पुणे, दि.13 नोव्हेंबर 2017- एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या एन.श्रीराम बालाजी याने इजिप्तच्या करिम मोहोमद मामौन तर साकेत मायनेनीने बोस्नियाच्या टोमीस्लाव्ह ब्रेकीक याचा पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत भारताच्या वाइल्ड कार्डद्वारे मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या भारताच्या साकेत मायनेनीने बोस्नियाच्या टोमीस्लाव्ह ब्रेकीक याचा 6-3, 4-6, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली. चुरशीच्या झालेल्या लढतीत पहिल्या सेटमध्ये साकेतने सुरेख सुरुवात करत आपल्या बिनतोड सर्व्हिसेसच्या जोरावर टोमीस्लाव्ह ब्रेकीकचा 6-3 असा पराभव करून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. सुरुवातीला दोघांनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सामन्यात 4-4अशी बरोबरी निर्माण झाली. नवव्या गेममध्ये ब्रेकीकने साकेतची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-4असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्येसाकेतने जबरदस्त पुनरागमन करत टोमीस्लाव्ह ब्रेकिकची पहिल्या व पाचव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट 6-2असा सहज जिंकला व सामन्यावर शिक्कामोर्तब केले. नवव्या मानांकीत कझाकस्तानच्या अॅलेक्झांडर नेदोव्येसोव याच्याकडून भारताच्या वाइल्ड कार्ड मिळालेल्या विष्णु वर्धन याला 3-6, 6-4, 6-7 असा पराभव पत्करावा लागला.
दुहेरी गटात पहिल्या फेरीत भारताच्या सुमित नागल व जपानच्या नाओकी नाकागावा या जोडीने भारताच्या सिध्दांत बांठिया व जयेश पुंगलीया यांचा 7-5, 6-0 असा पराभव केला, तर ग्रेट ब्रिटनच्या ब्रायडन क्लीन व ऑस्ट्रेलीयाच्या मार्क पोलमन्स यांनी सर्बियाच्या पेदजा क्रिस्टीन व तायपेच्या स्तुंग-ह्यु यांग यांचा 7-6, 6-3 असा पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- अंतिम पात्रता फेरी
काईची उचीडा(जपान, 1) वि.वि अॅलेक्सी पॉपरीन(ऑस्ट्रेलीया, 8) 6-4, 6-2
अॅनटोनी इस्कोफीर(फ्रांस, 3) वि.वि सिद्धार्थ रावत(भारत, 5) 6-2,6-3
हुगो ग्रेनिअर(फ्रांस, 4) वि.वि तिमुर खाबिबुलीन(कझाकस्तान) 6-2, 6-2
बोर्ना गोजो (क्रोटाया) वि.वि एन. विजय सुंदर प्रशांत(भारत,7) 6-1, 6-2
स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी गट-पहिली फेरी
अॅलेक्झांडर नेदोव्येसोव(कझाकस्तान,9)वि.वि.विष्णु वर्धन(भारत) 3-6, 6-4, 6-7
एन.श्रीराम बालाजी(भारत) वि.वि करिम मोहोमद मामौन(इजिप्त) 6-4, 6-2
साकेत मायनेनी(भारत) वि.वि.टोमीस्लाव्ह ब्रेकीक(बोस्निया)6-3, 4-6, 6-2
जय क्लर्क(ग्रेट ब्रिटन) वि.वि.मारीओ विलेल्ला मार्टीनेझ(स्पेन) 3-6, 6-4, 6-4
दुहेरी गट- पहिली फेरी
ब्रायडन क्लीन(ग्रेट ब्रिटन)/मार्क पोलमन्स(ऑस्ट्रेलीया,2) वि.वि पेदजा क्रिस्टीन (सर्बिया)/स्तुंग-ह्यु यांग(तायपे) 7-6, 6-3
सुमित नागल(भारत)/नाओकी नाकागावा(जपान) वि.वि.सिध्दांत बांठिया(भारत)/ जयेश पुंगलीया(भारत) 7-5, 6-0