पुणे- आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या सहकार्याने व नवनाथ शेटे स्पोर्टस् अकादमी तर्फे आयोजित एआयटीए, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 25000डॉलर पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत भारताच्या मिहिका यादवने रशियाच्या सातव्या मानांकीत याना सिझीकोवाचा 6-3, 7-5 असा पराभव केला.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरी गटात दुस-या फेरीत भारताच्या बिगर मानांकीत मिहिका यादवने रशियाच्या सातव्या मानांकीत याना सिझीकोवाचा 6-3, 7-5 असा पराभव करत खळबळजनक निकालाची नोंद केली. अव्वल मानंकीत ईस्त्रायलच्या डेनिझ खाजान्युकने रशियाच्या ओलेसी पेरवुशीना 6-4, 6-2 असा पराभव केला. रोमानीयाच्या दुस-या मानांकीत जॉकलीन अदिना क्रिस्टीन हीने तुर्कीच्या बेरफु सेंग्झीचा 7-5, 6-2 असा पराभव केला. भारताच्या तिस-या मानांकीत करमान कौर थंडीने भारताच्याच रिया भाटीयाचा 6-4, 4-6, 7-6(5) असा टायब्रेकमध्ये पराभव केला.
दुहेरी गटात उपांत्यपुर्व फेरीत चायनीज तायपेच्या पी-ची ली व रशियाच्या याना सिझीकोवा यांनी भारताच्या साई संहिता चमर्थी व अमृता मुखर्जी यांचा 6-2, 6-0 असा सहज पराभव करत आगेकुच केली तर सिंगापुरच्या स्टेफनी टान व भारतच्या धृती वेणुगोपाल या जोडीने भारताच्या स्नेहल माने व नताशा पल्हा यांचा 6-2, 6-3 असा पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- दुसरी फेरी
डेनिझ खाजान्युक(ईस्त्रायल,1) वि.वि ओलेसी पेरवुशीना(रशिया)6-4, 6-2
जॉकलीन अदिना क्रिस्टीन(रोमानीया,2) वि.वि बेरफु सेंग्झी(तुर्की) 7-5, 6-2
करमान कौर थंडी(भारत,3) वि.वि रिया भाटीया (भारत) 6-4, 4-6, 7-6(5)
वालेरीया स्त्राखोवा(युक्रेन,4) वि.वि निधी चिलुमूला(भारत) 6-1, 6-3
एना वेसेलीनोवीक(मोन्टेनेग्रो,6) वि.वि सालसा आहेर 6-1, 7-5
मिहिका यादव(भारत) वि.वि याना सिझीकोवा(रशिया, 7) 6-3, 7-5
तेरेझा मिहालीकोवा (स्लोवाकीया,8) वि.वि प्ररणा भांब्री(भारत) 6-1, 6-2
ऋतुजा भोसले(भारत) वि.वि स्नेहल माने(भारत) 6-4, 6-2
करीन केनेल(स्वित्झरलॅंड) वि.वि स्केनीया पालकीना(करगिझस्थान) 6-3, 6-3
फातमा अल नभानी(ओमान)- प्रांजला येडलापल्ली(भारत) 6-4, 6-7(4), 6-4
दुहेरी गट- उपांत्यपुर्व फेरी
पी-ची ली(5, चायनीज तायपे)/ याना सिझीकोवा(रशिया, 3) वि.वि साई संहिता चमर्थी (भारत)/अमृता मुखर्जी(भारत) 6-2, 6-0
स्टेफनी टान(सिंगापुर)/ धृती वेणुगोपाल(भारत) वि.वि स्नेहल माने(भारत)/ नताशा पल्हा(भारत) 6-2, 6-3