पुणे: ट्रिनिटी इंजिनिअरींग व इंजिन इनसाईट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने आयोजित अव्हेरनेस क्लब क्रिकेट करंडक स्पर्धेत आय.ईरा संघाने सचिन पायगुडे स्पोर्टस् संघाचा तर श्रीजी डेविहलपर्स संघाने अथा मिडीया संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
के.जे इन्स्टिटयूट, पुणे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सागर मगरच्या 132 धावांच्या बळावर आय.ईरा संघाने सचिन पायगुडे स्पोर्टस् संघाचा 113 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना आय.ईरा संघाने 20 षटकात 5 बाद 211 धावा केल्या. 211 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना प्रसन्न भोईटेच्या अचूक गोलंदाजीपुढे सचिन पायगुडे स्पोर्टस् संघ 16.5 षटकात सर्वबाद 98 धावांत गारद झाला. यात संतोष पडवळने 35 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. सागर मगर सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत सुरज शिंदेच्या नाबाद 77 धावांच्या जोरावर श्रीजी डेविहलपर्स संघाने अथा मिडीया संघाचा सर्व 10 गडी राखून सहज पराभ केला. पहिल्यांदा खेळताना अथा मिडीया संघाना 20 षटकात सर्वबाद 96 धावा केल्या. यात कुणाल रामटेकेने 29 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. 96 धावांचे लक्ष श्रीजी डेविहलपर्स संघाने सुरज शिंदेच्या नाबाद 77 व स्वप्निल मुंगेल नाबाद 21 धावांच्या बळावर केवळ 7.3 षटकात एकही गडी न गमावता 101 धावांसह सहज पुर्ण केले. सुरज शिंदे सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
आय.ईरा- 20 षटकात 5 बाद 211 धावा(सागर मगर 132(67), गोकुळ देशमुख 20, संतोष पडवळ 2-39, नवनाथ साठे 1-34) वि.वि सचिन पायगुडे स्पोर्टस्- 16.5 षटकात सर्वबाद 98 धावा(संतोष पडवळ 35, नवनाथ साठे 19, प्रसन्न भोईटे 36-4, नवनाथ साठे 1-34) सामनावीर- सागर मगर
आय.ईरा संघाने 113 धावांनी सामना विजय मिळवला.
अथा मिडीया- 20 षटकात सर्वबाद 96 धावा(कुणाल रामटेके 29, श्रीराम कटकवार 20, कुणाल फणसे 3-15, पराग चितळे 1-16) पराभव वि श्रीजी डेविहलपर्स- 7.3 षटकात 0 बाद 101 धावा(सुरज शिंदे नाबाद 77, स्वप्निल मुंगेल नाबाद 21) सामनावीर- सुरज शिंदे
श्रीजी डेविहलपर्स संघाने 10 गडी राखून सामना जिंकला.


