पुणे- कारा इंटलेक्ट यांच्या व्यवस्थापन आणि संकल्पनेतून व पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या संलग्नतेने इंडो शॉटले पीपीएल क्रिकेट 2017 स्पर्धेत रोहन छाजेडच्या नाबाद ३० धावांच्या खेळीच्या जोरावर गोल्डफिल्ड डॉल्फिन्स संघाने सुपर लायन्स संघाचा २७ धावांनी पराभव विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर आजपासून झालेल्या या स्पर्धेत पहिल्यांदा खेळताना गोल्डफिल्ड डॉल्फिन्स संघाने ६षटकात ३बाद ६९धावा केल्या. यात रोहन छाजेडने नाबाद ३०धावा, नचिकेत जोशीने १० धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. सुपर लायन्सकडून सोहन अनगळ १-७, आदित्य मेडकेकर १-११, नील हळबे १-१५)यांनी प्रत्त्येकी एक गडी बाद केले. या आव्हानाचा पाठलाग करताना सुपर लायन्स संघाला ६षटकात २बाद ४७धावापर्यंत मजल मारता आली. यामध्ये श्रेयश वर्तक २२, आशिष राठी १७ यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. गोल्डफिल्ड डॉल्फिन्सकडून शुभांकर जोशीने १२ धावात २ गडी बाद केले. सामनावीर रोहन छाजेड ठरला.
स्पर्धेचे उदघाटन इंडो शॉटलेचे अजित खेर, ब्रिहंसचे मंदार आगाशे आणि होडेकचे अभिजित खानविलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबचे मानद सचिव कुमार ताम्हाणे, अविनाश जाधव, क्लबच्या क्रिकेट विभागाचे राजू भालेकर, कारा इंटलेक्टचे रणजित पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
गोल्डफिल्ड डॉल्फिन्स: ६षटकात ३बाद ६९धावा(रोहन छाजेड नाबाद ३०, नचिकेत जोशी १०, सोहन अनगळ १-७, आदित्य मेडकेकर १-११, नील हळबे १-१५)वि.वि.सुपर लायन्स: ६षटकात २बाद ४७धावा(श्रेयश वर्तक २२, आशिष राठी १७, शुभांकर जोशी २-१२);सामनावीर-रोहन छाजेड.