एफसी पुणे सिटीच्या खेळाडूंसाठी नव्या मौसमासाठी नव्या जर्सीचे अनावरण
पुणे- राजेश वाधवान समुह आणि अर्जुन कपुर यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीगमधील टीम असलेल्या एफसीपुणे सिटी संघाच्या 2017 मौसमासाठी नव्या आकर्षक रंगसंगती व डिझाईनची होम आणि अवे जर्सीचे अनवारण करण्यात आले. फिनिक्स मार्केट सिटी येथील ऍट्रियम सिक्स लेव्हल येथे झालेल्या शानदार समारंभात सहमालक अर्जुन कपुर, मार्सिलिन्हो, जोनाथन लुक्का, एमिलिआनो अल्फारो, मार्कोस् टेबर, किआन लुईस, आदिल रशिद, विशाल कैथ या अव्वल खेळाडूंनीही रँप वॉकर सहभाग घेतला. एफसी पुणे सिटी संघाच्या हजारो चाहत्यांनी उपस्थित राहून पाठिंबा व्यक्त केला.
नव्या मौसमाचे आव्हान जवळ आल्याचे ध्यानात घेऊन गेल्या मौसमाच्या जर्सीमध्ये थोडा बदल करण्याचा निर्णय क्लबने घेतला. अर्थात, नव्या जर्सीमध्येही क्लबची खासियत असलेल्या ऑरेंज व पर्पल रंगांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु याशिवाय वरच्या बाजूला असलेल्या ऑरेंज टॉपपासून खालच्या बाजूला असलेल्या पर्पल स्पॉटपर्यंत जाणारे आडवे पट्टे राऊंड नेक स्टाईलच्या जर्सीला अधिकच आकर्षक बनवितात. या शिवाय अवे जर्सीला सीमच्या बरोबर निळ्या रेषांच्याही डिझाईनचा समावेश करण्यात आला आहे.
एफसी पुणे सिटी मु‘य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल म्हणाले की, गेल्या वर्षीच्या जर्सीत यंदा करण्यात आलेला बदल हा नव्या मौसमासाठी आमच्या सकारात्मक मानसिकतेचे प्रतिक आहे. तसेच, या जर्सीवर असलेल्या आमच्या क्लबचे बोधचिन्ह हे आमचे खेळाडू, चाहते व सर्व पुरस्क र्ते व हितसंबंधी यांच्यासाठी अभिमानाची व प्रतिष्ठेची बाब आहे. म्हणूनच या उत्पादनाचा जागतिक दर्जाही अत्यावश्यक गोष्ट ठरली. त्याचप्रमाणे या जर्सीमध्ये केलेला अत्यंत थोडा बदल आणि पारंपारिक डिझाईन कायम ठेवण्याची आमची शैली यामुळे पुणे शहराच्या समृध्द संस्कृतीशी असलेले नाते कायम राहिले आहे.
आदिदास इंडियाच्या फुटबॉल व बास्केटबॉल विभागाचे संचालक ऋषिकेश शेंडे म्हणाले की, 2017-18 या मौसमासाठी एफसी पुणे सिटी संघाशी आमचा सहयोग जाहिर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आदिदासने नेहमीच जागतिक दर्जाची उत्पादने दर्जेदार खेळाडूंसाठी निर्माण करण्यात पुढाकार घेतला आहे आणि एफसी पुणे सिटी संघासाठी यंदाच्या मौसमाकरिता तयार केलेल्या जर्सीवर खेळाडूंनी अत्यंत समाधान व्यक्त केले आहे, याचा आम्हांला आनंद वाटतो आहे. दरवर्षी अधिक चांगल्या दर्जाची जर्सी बनवून दिल्यामुळे खेळाडूंना या जर्सीमध्ये अधिक आरामदायक वाटत असते. तसेच, ही जर्सी परिधान करून सर्वोत्तम कामगिरी करणे शक्य होते, याचा आम्हांला अभिमान वाटतो.