पुणे, दि.27 फेब्रुवारी 2021: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली आयोजित एमएसएलटीए अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरिज 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात पहिल्या फेरीत अर्चित धूत, साईराज साळुंके, अर्णव बनसोडे, क्रिशांक जोशी या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात बिगरमानांकीत अर्चित धूत याने दुसऱ्या मानांकित शौर्य घोडकेचा 8-2 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. साईराज साळुंकेने चौथ्या मानांकित आदित्य आयंगरवर 8-5 असा सनसनाटी विजय मिळवला. पुण्याच्या क्रिशांक जोशीने सातव्या मानांकित पृथ्वीराज हिरेमठला 8-1 असे सहज पराभूत केले. पुण्याच्या अर्णव बनसोडे याने सहाव्या मानांकित मुंबईच्या अयान शेट्टीचा 8-3 असा पराभव करून आगेकूच केली. औरंगाबादच्या अव्वल मानांकित नीरज रिंगणगावकर याने पुण्याच्या विश्वजीत सणसचे आव्हान टायब्रेकमध्ये 8-7(3) असे मोडीत काढले. मुलींच्या गटात अव्वल मानांकितप्रिशा शिंदे हिने स्वरा जावळेला 8-0 असे नमविले. ईश्वरी मार्कंडेने अवंती वाघचा 8-1 असा तर, काव्या देशमुखने श्रीमोई कामतचा 8-0 असा एकतर्फी पराभव करून दुसरी फेरी गाठली. सातव्या मानांकित मेहक कपूर हिने भक्ती ताजनेचा 8-3 असा सहज पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुले: पहिली फेरी:नीरज रिंगणगावकर(1) वि.वि.विश्वजीत सणस 8-7(3);मनन अगरवाल वि.वि.वैष्णव रानवडे 8-4;अवनीश चाफळे वि.वि.हर्ष जूनघरे 8-2;अहान शेट्टी(5) वि.वि.सूर्या काकडे 8-4;स्वराज ढमढेरे(3) वि.वि.अहान डे 8-0;अर्चित धूत वि.वि.शौर्य घोडके(2) 8-2;साईराज साळुंके वि.वि.आदित्य आयंगर(4) 8-5;क्रिशांक जोशी वि.वि.पृथ्वीराज हिरेमठ(7)8-1;अर्णव बनसोडे वि.वि.अयान शेट्टी(6) 8-3;दक्ष पाटील वि.वि.स्वर्णिम येवलेकर 8-5;मुली: प्रिशा शिंदे(1)वि.वि.स्वरा जावळे 8-0;ईश्वरी मार्कंडे वि.वि.अवंती वाघ 8-1;सलोनी परीदा(6) वि.वि.रिद्धी शिंदे 8-5;काव्या देशमुख वि.वि.श्रीमोई कामत 8-0;आर्या बोरकर(5) वि.वि.याना अरोरा 8-0;श्रेया पठारे वि.वि.स्नेहा गजभर 8-3;
मेहक कपूर(7) वि.वि.भक्ती ताजने 8-3.
14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत अर्चित धूत, साईराज साळुंके, अर्णव बनसोडे, क्रिशांक जोशी यांचा मानांकित खेळाडूंवर विजय
Date:

