पुणे रॉयल स्ट्रायकर्स, ट्रोजन्स संघांची विजयी सलामी

Date:

पुणे-: कर्मा 9 स्पोर्ट्स यांच्या तर्फे व रेडबुल यांच्या सहकार्याने आयोजित कर्मा 9 टी-20 कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेत पुणे रॉयल स्ट्रायकर्स, ट्रोजन्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली. 

लिजेंड्स क्रिकेट मैदान येथे आठवड्याच्या शेवटी दर शनिवार व रविवार या दिवशी सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सलामीच्या सामन्यात सुजा सुल्तान(5-11)याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पुणे रॉयल स्ट्रायकर्स संघाने अयोध्या वॉरियर्स संघाचा 9 गडी राखून पराभव केला. पुणे रॉयल स्ट्रायकर्सच्या सुजा सुल्तान(5-11), विशाल प्रभाकर(3-11), मयुरेश लिखिते(1-14) यांनी केलेल्या गोलंदाजीपुढे अयोध्या वॉरियर्स संघाचा डाव 12.3षटकात 59धावावर गारद झाला. हे आव्हान पुणे रॉयल स्ट्रायकर्स संघाने केवळ 4.5षटकात 1बाद 63धावा करून पूर्ण केले. यात सिद्धार्थ रोमनने नाबाद 36धावा, अनिरुद्ध कुलकर्णीने नाबाद 14 धावा करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी सुजा सुल्तान ठरला.

दुसऱ्या सामन्यात प्रसाद गिरकर(नाबाद 67धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ट्रोजन्स संघाने ए अँड डायजेस्ट संघाचा 6 गडी राखून पराभव करत शानदार सुरुवात केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:अयोध्या वॉरियर्स: 12.3षटकात सर्वबाद 59धावा(प्रणव नातू नाबाद 20, अमित गणपुले 14, सुजा सुल्तान 5-11, विशाल प्रभाकर 3-11, मयुरेश लिखिते 1-14)पराभूत वि.पुणे रॉयल स्ट्रायकर्स: 4.5षटकात 1बाद 63धावा(सिद्धार्थ रोमन नाबाद 36(19,9×4), अनिरुद्ध कुलकर्णी नाबाद 14, गिरीश ओक 1-22);सामनावीर-सुजा सुल्तान; पुणे रॉयल स्ट्रायकर्स 9 गडी राखून विजयी;

ए अँड आय डायजेस्ट: 19.5षटकात सर्वबाद 122धावा(कोशिष धूत 25(37), अभिषेक दवे 14, योगेश बालवडकर 11, गौरव उपाध्याय 4-18, स्वप्निल आवळे 1-6, सुहास जगदाळे 1-14) पराभूत वि.ट्रोजन्स: 18.2षटकात 4बाद 123धावा(प्रसाद गिरकर नाबाद 67(50,10×4,1×6), स्वप्निल आवळे 38(42,6×4), अभिषेक दवे 2-26);सामनावीर-प्रसाद गिरकर; ट्रोजन्स संघ 6 गडी राखून विजयी.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...