- अभिषेक निशाद व प्रथमेश बजारीची भेदक गोलंदाजी
पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत ब गटाच्या लढतीत अभिषेक निशाद(4-20), प्रथमेश बजारी(3-11) यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर कम्बाईन डिस्ट्रिक्ट संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा 5 गडी राखून पराभव करत शानदार सुरुवात केली.
नेहरू स्टेडियम मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत ब गटात प्रथम फलंदाजी करताना कम्बाईन डिस्ट्रिक्टच्या भेदक गोलंदाजी व क्षेत्ररक्षणापुढे क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा डाव 39.3षटकात 115 धावावर कोसळला. यात हर्षल क्षीरसागर 24, आदेश गायकवाड 16, रोहित चौगुले 14 यांनी थोडासा प्रतिकार केला. कम्बाईन डिस्ट्रिक्ट संघाकडून अभिषेक निशाद(4-20), प्रथमेश बजारी(3-11), अनिकेत इंद्रजीत(1-16), सौरभ शिंदे(1-10) यांनी अफलातून गोलंदाजी करत संघाच्या विजयाचा पाया रचला.
याच्या उत्तरात कम्बाईन डिस्ट्रिक्ट संघाने हे आव्हान 26.1षटकात 5 गड्यांच्या बदल्यात 116धावा करून पूर्ण केले. यात सलामीची जोडी झटपट बाद झाली त्यामुळे कम्बाईन डिस्ट्रिक्ट संघ 12.4 षटकात 2 बाद 31 धावा असा अडचणीत आला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या उबेद खानने 38 धावा, व अभिषेक पवारने 23धावा यांनी तिसऱ्या गड्यासाठी 45 चेंडूत 42 धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. त्यानंतर सचिन धासने नाबाद 22 धावांची खाली करून संघाला विजय मिळवून दिला. क्लब ऑफ महाराष्ट्रकडून शुभम मेड(2-28), मुकुल यादव(2-43), साहिल कोहिनकर(1-23) यांनी गोलंदाजी केली. सामनावीर अभिषेक निशाद ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: गटसाखळी फेरी: गट ब: क्लब ऑफ महाराष्ट्र: 39.3षटकात सर्वबाद 115 धावा(हर्षल क्षीरसागर 24(38,3×4), आदेश गायकवाड 16, रोहित चौगुले 14, अभिषेक निशाद 4-20, प्रथमेश बजारी 3-11, अनिकेत इंद्रजीत 1-16, सौरभ शिंदे 1-10) पराभूत वि.कम्बाईन डिस्ट्रिक्ट: 26.1षटकात 5बाद 116धावा(उबेद खान 38(54,6×4), अभिषेक पवार 23(26,2×4,1×6), सचिन धास नाबाद 22(9,5×4), शुभम मेड 2-28, मुकुल यादव 2-43, साहिल कोहिनकर 1-23);सामनावीर-अभिषेक निशाद; कम्बाईन डिस्ट्रिक्ट 5 गडी राखून विजयी;

