पुणे: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित 12 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील दुसऱ्या पीएमडीटीए-केपीआयटी लिटल कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2021 स्पर्धेत मुलांच्या गटात राघव सरोदे याने, तर मुलींच्या गटात रित्सा कोंडकर या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आगेकूच केली.
महाराष्ट्र पोलिस(एमटी जिमखाना)टेनिस जिमखाना,परिहार चौक, औध येथे सुरू असलेल्या मुलांच्या गटात बिगरमानांकीत राघव सरोदे याने पाचव्या मानांकित सक्षम भन्साळीचा 6-3 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. अव्वल मानांकित समीहन देशमुख याने रुद्र मेमाणेचा 6-1 असा तर, क्षितीज अमीनने प्रत्युष बगाडेचा 6-0 असा पराभव करून उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
मुलींच्या गटात रित्सा कोंडकर हिने आठव्या मानांकित काव्या तुपेचा टायब्रेकमध्ये 6-5(5) असा पराभव करून अनपेक्षित निका नोंदविला. अव्वल मानांकित मृणाल शेळकेने वीरा हरपुडेला 6-1 असे नमविले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: 12 वर्षाखालील मुले:समीहन देशमुख(1) वि.वि.रुद्र मेमाणे 6-1;क्षितीज अमीन वि.वि.प्रत्युष बगाडे 6-0;नमिश हूड(3) वि.वि.निव गोजिया 6-2;आर्यन कीर्तने वि.वि.वीरेन चौधरी 6-0;राघव सरोदे वि.वि.सक्षम भन्साळी(5) 6-3;अर्जुन येलभर(2) वि.वि.स्वर्णिम येवलेकर 6-2;
12वर्षाखालील मुली: दुसरी फेरी:मृणाल शेळके(1) वि.वि.वीरा हरपुडे 6-1;वंशिका अगरवाल वि.वि.किया तेलंग 6-5(3);श्रेया पठारे वि.वि.जसलीन कटारिया 6-1;स्वरा जावळे वि.वि.सरिशा जमेनीस 6-0;रित्सा कोंडकर वि.वि.काव्या तुपे(8) 6-5(5);ध्रुवा माने(3) वि.वि.शिबानी गुप्ते 6-1.
राघव सरोदे, रित्सा कोंडकर यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का
Date:

