एम 3 करंडक आंतरक्लब 23 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत अँबिशियस क्रिकेट अकादमी, पीवायसी हिंदू जिमखाना संघांचे विजय

Date:

पुणे, 23 जानेवारी 2021- पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित एम 3 करंडक आंतर क्लब 23 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत गटसाखळी फेरीत अँबिशियस  क्रिकेट अकादमी व पीवायसी हिंदू जिमखाना या संघांनी अनुक्रमे क्लब ऑफ महाराष्ट्र व पूना क्लब या संघांचा पराभव करून आगेकूच केली.

नेहरू स्टेडियम व पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत पहिल्या सामन्यात तनिश जैन(3-23) याने केलेल्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा  6 गडी राखून पराभव करत सलग तिसरा विजय नोंदविला. अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व तो त्यांच्या गोलंदाजांनी अचूक ठरविला. अँबिशियस क्रिकेट अकादमीच्या तनिश जैन(3-23), वैभव विभुते(2-29), व्यंकटेश दराडे(2-4), नरेंद्र पाटील(1-7), सचिन भोसले(1-17)यांनी केलेल्या भेदक गोलंदाजी व क्षेत्ररक्षणापुढे क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा डाव 37.4 षटकात अवघ्या 105 धावावर संपुष्टात आला. यात संकेत चव्हाण नाबाद 22, राजवर्धन उंडरे 14, सागर आनंदपुरे 13, यश क्षीरसागर 14 यांनी थोडासा प्रतिकार केला. हे आव्हान अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाने 29.2षटकात 4गड्यांच्या बदल्यात 108धावा करून पूर्ण केले. यात अभिषेक पवारने 59 चेंडूत 5चौकार व 1षटकारांच्या मदतीने 44धावा, ऋषिकेश बारणेने 71 चेंडूत 4चौकारांच्या साहाय्याने नाबाद 32 धावा करून संघाचा विजय सुकर केला. क्लब ऑफ महाराष्ट्रकडून वैभव गोसावी(1-13), प्रज्वल गुंड(1-26), संकेत चव्हाण(1-29), यश क्षीरसागर(1-25) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. सामन्याचा मानकरी तनिश जैन ठरला.

दुसऱ्या सामन्यात आदित्य लोंढे(63 धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने पूना क्लब संघाचा   3 गडी राखून पराभव करून स्पर्धेतील आपला पहिलाच विजय नोंदविला. प्रथम फलंदाजी करताना पूना क्लब संघाने 45षटकात 8बाद 229धावाचे आव्हान उभे केले. सलामीचे  फलंदाज रौनक ढोलेपाटील 15 धावा व आर्यन गाडगीळ हे झटपट बाद झाल्यानंतर तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करण्यास आलेल्या वरद कुलकर्णीने 73चेंडूत 5चौकार व 1षटकारांच्या मदतीने 49 धावांची संयमपूर्ण फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. त्यानंतर अक्षय खोपडे नाबाद 42, आर्यमान पिल्ले 28, विशाल गायकवाड 22, राजकमल चौहान 37 यांनी धावा काढून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. पीवायसीकडून आकाश जाधव(3-52), साहिल चुरी(2-64), यश खळदकर(1-23)यांनी सुरेख गोलंदाजी केली. याच्या उत्तरात पीवायसी हिंदू जिमखाना संघाने हे आव्हान 42.2षटकात 7बाद 231धावा करून पूर्ण केले. सलामीची जोडी अमेय भावे(20 धावा) व श्रेयश वाळेकर(11धावा) झटपट बाद झाल्याने पीवायसी संघ 43 धावा अशा स्थितीत होता. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या आदित्य लोंढे याने 76चेंडूत 3चौकार व 2षटकारांसह 63 धावा व अखिलेश गवळीने(17धावा) यांनी चौथ्या गड्यासाठी 67 चेंडूत 42 धावांची भागीदारी केली. अखिलेश गवळी बाद झाल्यानंतर आदित्य याने यश माने(27धावा)च्या साथीत पाचव्या गड्यासाठी 48 चेंडूत 47 धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. पण हे दोघेही बाद झाल्यानंतर पीवायसी संघ 38 षटकात 7बाद 176 धावा असा अडचणीत असताना साहिल चुरीने 26चेंडूत नाबाद 26 धावा व यश खळदकरने 18 चेंडूत 5चौकार व 1षटकारांसह नाबाद 34 धावा करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पूना क्लबकडून ओंकार साळुंखे याने 44धावात सर्वाधिक 3 गडी बाद केले. सामनावीर आदित्य लोंढे ठरला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: गटसाखळी फेरी:  
क्लब ऑफ महाराष्ट्र: 37.4 षटकात सर्वबाद 105 धावा(संकेत चव्हाण नाबाद 22(45,3×4), राजवर्धन उंडरे 14, सागर आनंदपुरे 13, यश क्षीरसागर 14, तनिश जैन 3-23, वैभव विभुते 2-29, व्यंकटेश दराडे 2-4, नरेंद्र पाटील 1-7, सचिन भोसले 1-17) पराभूत वि.अँबिशियस क्रिकेट अकादमी: 29.2षटकात 4बाद 108धावा(अभिषेक पवार 44(59,5×4,1×6), ऋषिकेश बारणे नाबाद 32(71,4×4), अनिकेत पोरवाल नाबाद 14, सिद्धांत दोशी 11, वैभव गोसावी 1-13, प्रज्वल गुंड 1-26, संकेत चव्हाण 1-29, यश क्षीरसागर 1-25);सामनावीर-तनिश जैन; अँबिशियस क्रिकेट अकादमी 6 गडी राखून विजयी;

पूना क्लब:45षटकात 8बाद 229धावा(वरद कुलकर्णी 49(73,5×4,1×6), अक्षय खोपडे नाबाद 42(49,2×4,2×6), आर्यमान पिल्ले 28(41,4×4), विशाल गायकवाड 22(33,4×4), राजकमल चौहान 37(26,2×4,3×6), रौनक ढोलेपाटील 15, आकाश जाधव 3-52, साहिल चुरी 2-64, यश खळदकर 1-23) पराभूत वि.पीवायसी हिंदू जिमखाना: 42.2षटकात 7बाद 231धावा(आदित्य लोंढे 63(76,3×4,2×6), यश माने 27(30,4×4), साहिल चुरी नाबाद 26(26,2×6), यश खळदकर नाबाद 34(18,5×4,1×6), अमेय भावे 20(16,4×4), अखिलेश गवळी 17, श्रेयश वाळेकर 11, ओंकार साळुंखे 3-44, विशाल गायकवाड 2-51, राजकमल चौहान 1-26, अमेय मुजुमदार 1-59);सामनावीर-आदित्य लोंढे; पीवायसी संघ 3 गडी राखून विजयी.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...