पुणे, 12 फेब्रुवारी 2020: विलास इलेव्हन यांच्या वतीने आयोजित तेंडुलकर करंडक 16 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पीवायसी हिंदू जिमखाना संघाने स्पोर्टस् पार्क क्रिटेट अकादमी संघाचा तर भिमाशंकर क्रिकेट अकादमी संघाने आरपीसीए संघाचा पराभव करत स्पर्धेत पहिला विजय मिळवला.
डीएसके विश्व स्टार क्रिकेट अकादमी मैदानावर मिहिर देशमुख नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 20 षटकात 4 बाद 176 धावा केल्या. यात यतिंद्र कारलेकरने 40 व स्वराज चव्हाणने 33 धावा करून मिहिरला सुरेख साथ दिली. 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अक्षत जैन व अश्विन कोठावदे यांच्या अचूक गोलंदाजीने स्पोर्टस् पार्क क्रिटेट अकादमी संघाचा डाव 20 षटकात 7 बाद 109 धावांत रोखला. केवळ 31 चेंडूत 55 धावा करणारा मिहिर देशमुख सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत विनय शर्माच्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर भिमाशंकर क्रिकेट अकादमी संघाने आरपीसीए संघाचा 26 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना अप्रीतच्या 26 व सौरव यादवच्या 19 धावांसह भिमाशंकर क्रिकेट अकादमी संघाने 18.4 षटकात सर्वबाद 103 धावा केल्या. 103 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विनय शर्मा , रोहित दांडीया व रोहित माळी यांच्या अचूक गोलंदाजी पुढे आरपीसीए संघ 17.4 षटकात सर्वबाद 77 धावांत गारद झाला. विनय शर्मा सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
पीवायसी हिंदू जिमखाना- 20 षटकात 4 बाद 176 धावा(यतिंद्र कारलेकर 40(48), मिहिर देशमुख नाबाद 55(31), स्वराज चव्हाण 33(24), श्रेयस जाधव 2-15) वि.वि स्पोर्टस् पार्क क्रिटेट अकादमी- 20 षटकात 7 बाद 109 धावा(श्रेयस जाधव 40(35), साहिल पारख 17(17), अक्षत जैन 2-28, अश्विन कोठावदे 2-15) सामनावीर- मिहिर देशमुख
पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 58 धावांनी सामना जिंकला.
भिमाशंकर क्रिकेट अकादमी- 18.4 षटकात सर्वबाद 103 धावा(अप्रीत 26(32), सौरव यादव 19(18), शुभम पाटील 4-18, कार्तिक शिंदे 2-15) वि.वि आरपीसीए- 17.4 षटकात सर्वबाद 77 धावा(अमर्त्य अरली 14, अभिषेक चव्हाण 14(11), विनय शर्मा 2-11, रोहित दांडीया 2-21, रोहित माळी 2-3) सामनावीर- विनय शर्मा
भिमाशंकर क्रिकेट अकादमी संघाने 26 धावांनी सामना जिंकला.