पुरुष स्नूकर गटात आदित्य मेहता याला विजेतेपद ,महिला स्नूकर गटात विद्या पिल्लई हिला विजेतेपद

Date:

पुणे: बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या वतीने आयोजित व मनिषा कन्स्ट्रक्शन आणि व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड प्रायोजित मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्ड्स व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत वरिष्ठ पुरुष स्नूकर गटात महाराष्ट्राच्या पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डच्या आदित्य मेहता याने 23वेळा जागतिक विजेतेपद पटकावणाऱ्या पीएसपीबीच्या पंकज अडवानीवर 6-2 असा सनसनाटी विजय मिळवत विजेतेपद संपादन केले.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत वरिष्ठ पुरुष स्नूकर गटात 6तास 30मिनिटे चाललेल्या अंतिम फेरीच्या लढतीत आदित्य मेहता याने पंकज अडवानीचा 6-2{103(103)-17, 50-58(47), 47-48, 70-40, 83(51)-36, 69(61)-07, 79-29, 64-28)असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.

विश्वविजेत्या पंकजला अंतिम फेरीच्या लढतीत आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करता आली नाही. अंतिम फेरीच्या एकतर्फी लढतीत आदित्यने पंकजला फारशी संधी दिली नाही. ही लढत फारशी संधी न देता आदित्यने अशी बाजी मारून विजेतेपदाचा मान मिळवला. अंतिम फेरीपर्यंतच्या वाटचालीत आदित्यने शानदार कामगिरी केली होती. त्याने याआधी पुष्पेंदर सिंग, वरून मदन यांच्यासारख्या दर्जेदार खेळाडूंना पराभूत केले होते. यामुळे अंतिम लढत रंगतदार होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, निर्णायक लढतीत पंकजला आदित्यने डोके वर काढू दिले नाही. सामन्यात सुरुवातीला दोन्ही खेळाडूंनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. पहिली फ्रेम आदित्यने 103 गुणांचा ब्रेक नोंदवून 103(103)-17 अशी जिंकली. तर, दुसरी फ्रेम पंकजने 58(47)-50 अशी जिंकून बरोबरी साधली. त्यानंतर चौथ्या फ्रेममपर्यंत दोघांनी फ्रेम घेतल्या व सामन्यात 2-2अशी बरोबरी साधली. अखेर आदित्यने वरचढ खेळाचे प्रदर्शन करत पंकजविरुद्ध पुढील फ्रेम 70-40, 83(51)-36, 69(61)-07, 79-29 अशा जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. आठव्या फ्रेममध्ये 33-11अशा फरकाने आघाडीवर असताना आदित्यने ब्लु बॉल मिस केला. पण मिळालेल्या संधीचे पंकजला फारसा उपयोग करता आला नाही. आदित्यने ही फ्रेम 64-28 अशी जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. माजी पंकज अडवाणीला पराभूत केल्यानंतर विजयाचा आनंद व्यक्त करताना आदित्य म्हणाला की, माझे हे विजेतेपद जवळजवळ चार वर्षांनी मिळत असल्यामुळे माझ्यासाठी खास ठरले आहे. दरम्यानच्या काळात माझ्या दुःखापतीवर उपचार करून घेत असल्यामुळे मला स्पर्धांपासून दूर राहावे लागले होते. आता मात्र, मी या विजयाच्या क्षणाचा आनंद पुरेपूर लुटण्याचा आणि माझ्या कुटूंबीयांसह हा विजय साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारणदुःखापतीतून बरे होण्यापर्यंतचा काळ खूपच खडतर होता. परंतु माझ्या कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळे यामधून यशस्वीरीत्या बाहेर पडू शकलो.

मी अंतिम लढतीत सुरुवातच चांगली केल्यामुळे माझा विजय सोपा झाला. पहिल्याच फ्रेममध्ये मी शतकी ब्रेक देखील नोंदविला. त्यानंतर असहाय्य डोकेदुखीमुळे माजी लय काही वेळ गमावली होती.त्याचवेळी पंकजने 2-1अशी आघाडी घेतली.परंतु त्याचवेळी मी जोरदार पुनरागमन केले आणि माझा आत्मविश्वास कायम राखून पुन्हा सामन्यात मुसंडी मारली. माझ्या मते, विजय किंवा पराभव यासाठी काहीवेळा नशिबाचा कौलही महत्वाचा ठरतो. सामन्यात मी सर्वोत्तम कामगिरी केली आणित्यामुळे  मला विजेतेपदाचा मान पटकवता आला.

तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत माजी जागतिक सिक्स रेड स्नूकर विजेत्या पीएसपीबीच्या लक्ष्मण रावत याने आरएसपीबीच्या पुष्पेंदर सिंगचा (3-1) { 71(71)-05, 35-83, 64-08, 62-26 } असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला.

 

वरिष्ठ स्नूकर महिला गटात अंतिम फेरीत कर्नाटकाच्या विद्या पिल्लई हिने मध्यप्रदेशच्या अमी कमानीचा 3-2(41-68, 57-35, 37-61, 69-50, 87-05)असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.

स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण बीएसएफआयचे अध्यक्ष एम.सी.उत्तप्पा, बीएसएएमचे अध्यक्ष व मनिषा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक राजन खिंवसरा, पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव आनंद परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बीएसएफआयचे सचिव देवेंद्र जोशी, बीएसएएमचे उपाध्यक्ष सौमिल करकेरा व सिद्धार्थ पारीख, बीएसएएमचे मानद सचिव रिषभ कुमार व मानव पंचाल, खजिनदार शेखर सुर्वे, मुख्य रेफ्री अजय रस्तोगी, सलील देशपांडे, आदित्य देशपांडे आणि राजवर्धन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: वरिष्ठ स्नूकर पुरुष: अंतिम फेरी:

आदित्य मेहता(पीएसपीबी)वि.वि. पंकज अडवानी(पीएसपीबी)::6-2{103(103)-17, 50-58(47), 47-48, 70-40, 83(51)-36, 69(61)-07, 79-29, 64-28);

तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी: लक्ष्मण रावत(पीएसपीबी)वि.वि.पुष्पेंदर सिंग(आरएसपीबी)(3-1) { 71(71)-05, 35-83, 64-08, 62-26 }

 

वरिष्ठ स्नूकर महिला: अंतिम फेरी:

विद्या पिल्लई(कर्नाटक)वि.वि.अमी कमानी(मध्यप्रदेश)3-2(41-68, 57-35, 37-61, 69-50, 87-05);

तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी: वर्षा संजीव(कर्नाटक)वि.वि.अनुपमा रामचंद्रन(तामिळनाडू):: (2-0) { 78-28, 63-38}.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...