पुणे- आयडीयाज् अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ 14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2016-17 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 4 नोव्हेंबर पासून दर आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवारी पुना क्लब व पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मौदानावर होणार आहेत.
स्पर्धेत एकूण 32 संघांनी आपला सहभाग नोंदनला आहे. यामध्ये गतवर्षीचा विजेता संघ इन्फोसीस व उपविजेता अॅटॉस् संघ यांच्यासह टीसीएस, टेक महिंद्रा, सायबेज, आयबीएम, सनगार्ड एएस/ एफआयएस, गालाघर, केपीआयटी, टिएटो, सिमेंस, आयडीयाज् अ सास कंपनी, एल अॅड टी इन्फोटेक, अॅमडॉक्स्, सॉफ्टहार्ड ऑटोमेशन, कॅपजेमिनि, व्हेरीटास, सेल2वर्ड, हरमन, यार्डी, विप्रो, सिनेक्रोन, मर्क्स, परसिस्टंट सिस्टीम, स्प्रिगर नेचर, इक्यु- टेक्नोलॅजीज्, कॅग्निझंट, ऑल स्टेस सल्युशन, एमफसीस, आय प्लेस, एक्सट्रीम वेबटेक, टॅलेंटीका या संघांचा समावेश आहे.
स्पर्धेत 8 गट तयार करण्यात आले असून प्रत्येक गटात 4 संघांचा समावेश आहे. पहिल्या फेरीत प्रत्येक संघ 3 साखळी सामने खेळणार आहे. ही स्पर्धा साखळी व बाद पध्दतीने खेळविण्यात येणार आहे.
स्पर्धेत एकूण 1 लाखाची पारितोषिके देण्यात येणार आहेत. विजेत्या संघाला 50 हजार रूपये व करंडक, उपविजेत्या संघाला 30 हाजार रूपये व करंडक. तसेच मालिकावीरला 10 हजार रूपये व करंडक. सर्वोत्कृष्ट फलंदाजाला 5 हजार रूपये तर सर्वोत्कृष्ट गोलंदाजाला 5 हजार रूपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन आयडीयाज् अ सास इंडियाचे संचालक प्रशांत केएस, आयडीयाज् अ सास इंडियाचे माजी संचालक व उपाध्यक्ष राजीव नाशिककर, आयडीयाज् अ सास इंडियाच्या माजी एचआर अनुराधा दत्तगुप्ता, आयडीयाज् अ सास इंडियाच्या फायनान्स् हेड मल्लिका जेम्स्, विंग कमांडर व अंकुर जोगळेकर मेमोरीअल फाऊंडेशनचे अध्यक्ष उदय जोगळेकर व अंकुर जोगळेकर मेमोरीअल फाऊंडेशनचे उपअध्यक्ष विजय जोगळेकर यांच्या हस्ते होणार आहे.

