मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्ड्स व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महिला बिलियर्ड्समध्ये मध्यप्रदेशच्या अमी कमानीला विजेतेपद

Date:

वरिष्ठ स्नूकरमध्ये पंकज अडवानी, दिग्विजय कडीयन, वरून मदन, ईशप्रीत सिंग चड्डा यांचा बाद फेरीत प्रवेश

पुणे: बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या वतीने आयोजित व मनिषा कन्स्ट्रक्शन आणि व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड प्रायोजित मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्ड्स व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महिला बिलियर्ड्स गटात मध्यप्रदेशच्या अमी कमानी हिने दिल्लीच्या किरथ भंडालचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत वरिष्ठ बिलियर्ड्स महिला गटात अंतिम फेरीत मध्यप्रदेशच्या अमी कमानी हिने दिल्लीच्या किरथ भंडालचा  3-1(76-66, 55-75, 78-39, 75-32) असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. याआधी मध्ये अमी हिने या गटातील विजेतेपद पटकावले होते. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत महाराष्ट्राच्या अरांता सॅचेस हिने कर्नाटकाच्या आर.उमादेवी नागराजचा 2-0(75-62, 75-54) असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला.

वरिष्ठ स्नूकर मुलांच्या गटात राउंड रॉबिन फेरीत अ गटात 23वेळा जागतिक विजेतेपद पटकावणाऱ्या पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डच्या पंकज अडवानी याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत उत्तरप्रदेशच्या पारस गुप्ताचा 4-2(85(78)-15, 08-84(57), 95(54,25)-00, 24-71(70), 64-57, 66-17) असा पराभव करून बाद फेरी गाठली. ह गटात हरयाणाच्या दिग्विजय कडीयन याने महाराष्ट्राच्या शाहबाज खानचा 4-1(52-15, 67-32, 30-49, 69-36, 83-00) असा पराभव करून आगेकूच केली. याच गटात महाराष्ट्राच्या ईशप्रीत सिंग चड्डा याने कर्नाटकाच्या योगेश कुमारचा 4-1(52-56, 65-55, 103(56,47)-00, 58-54, 53-25) असा पराभव करून बाद फेरीत धडक मारली. तसेच, वरून मदन, ध्व्ज हरिया, पारस गुप्ता, नीरज कुमार संदीप गुलाटी, लक्ष्मण रावत, सुब्रत दास, आदित्य मेहता, विजय निचानी, कमल चावला, सिद्धार्थ पारीख, नितेश मदन, हसन बदामी, या खेळाडूंनीदेखील बाद फेरीत प्रवेश केला.

याआधी महिला बिलियर्ड्स गटातील विजेत्यांना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीएमडीटीएचे सचिव अभिषेक ताम्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बीएसएएमचे उपाध्यक्ष सिद्धार्थ पारीख, बीएसएएमचे मानद सचिव मानव पंचाल, सलील देशपांडे, मुख्य रेफ्री अजय रस्तोगी आणि राजवर्धन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: वरिष्ठ बिलियर्ड्स मुली: अंतिम फेरी:

अमी कमानी(मध्यप्रदेश)वि.वि.किरथ भंडाल(दिल्ली)3-1(76-66, 55-75, 78-39, 75-32);

तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी लढत: अरांता सॅचेस(महाराष्ट्र)वि.वि.आर.उमादेवी नागराज(कर्नाटक)2-0(75-62, 75-54);

 

 वरिष्ठ स्नूकर मुली: राउंड रॉबिन फेरी:

गट अ: आन्या पटेल(गुजरात)वि.वि.सान्वी शहा(मध्यप्रदेश)2-1(50-33, 50-61, 49-20);

गट ब: अरांता सॅचेस(महाराष्ट्र)वि.वि.शिविना ठाकूर(मध्यप्रदेश)2-0(88-04, 70-07);

गट क: रेणू भरकतीया(मध्यप्रदेश)वि.वि.पी.एस.एस.एंजल(आंध्रप्रदेश)2-0(52-42, 52-40);

गट क: विद्या पिल्लाई(कर्नाटक)वि.वि.मयुरी येवलीकर(महाराष्ट्र)2-0(92(82)-14, 70-12;

गट ड: नीता सांघवी(महाराष्ट्र)वि.वि.शर्मिला देवी(पॉंडिचेरी)2-0(57-03, 85-07);

गट इ: इशिका शहा(मध्यप्रदेश)वि.वि.मारियम अग्नीश(तामिळनाडू)2-0(46-16, 65-21);

गट ड: अनुपमा रामचंद्रन(तामिळनाडू)वि.वि.रूपा एस.(कर्नाटक)2-0(51-28, 56-30);

 

वरिष्ठ स्नूकर मुले: राउंड रॉबिन फेरी:

गट अ: पंकज अडवानी(पीएसपीबी)वि.वि.पारस गुप्ता(उत्तरप्रदेश)4-2(85(78)-15, 08-84(57), 95(54,25)-00, 24-71(70), 64-57, 66-17);

गट इ: हसन बदामी(महाराष्ट्र)वि.वि.अनुज भार्गवा(उत्तरप्रदेश)4-0(61-44, 62-08, 60-59, 57-18);

गट इ: नितेश मदन(आरएसपीबी)वि.वि.सौरव कोठारी(पीएसपीबी)4-2(81-58, 64-36, 02-59, 63-01, 47-56, 50-41);

गट ग: विश्वजित मोहन(उत्तरप्रदेश)वि.वि.मोहम्मद शोएब खान(पश्चिम बंगाल)4-2(83(83)-00, 57-36, 56-38, 38-49, 24-54, 60-37);

गट ग: वरून मदन(दिल्ली)वि.वि.ध्व्ज हरिया(पीएसपीबी)4-2(10-60, 88(65)-17, 73-38, 67-32, 51-79, 75-29);

गट फ: संदीप गुलाटी(दिल्ली)वि.वि.आयुष कुमार(पंजाब)4-0(63-61(57), 94-39, 71(53)-31, 63-28);

गट फ: नीरज कुमार(आरएसपीबी)वि.वि.ध्रुव वर्मा(पंजाब)4-3(71-29, 83-43, 30-88, 62-40, 49-62, 27-61, 66-47);

गट ह: दिग्विजय कडीयन(हरयाणा)वि.वि.शाहबाज खान()4-1(52-15, 67-32, 30-49, 69-36, 83-00);

गट ह: ईशप्रीत सिंग चड्डा(महाराष्ट्र)वि.वि.योगेश कुमार(कर्नाटक)4-1(52-56, 65-55, 103(56,47)-00, 58-54, 53-25);

गट आय: अविनाश(दिल्ली)वि.वि.कंकण सामशी(उत्तरप्रदेश)4-1(75-25, 21-75, 73-13, 66-36, 63(62)-10);

गट आय: पांडू रंगाइ(आरएसपीबी)वि.वि.सुमित तलवार(छत्तीसगड)4-2(74-44, 66-29, 85(69)-08, 63-64, 21-74, 61-41);

गट जे: पुष्पेंदर सिंग(आरएसपीबी)वि.वि.सुरज राठी(महाराष्ट्र)4-0(68-15, 58-10, 67-44, 68-35);

गट के: अनुज उप्पल(दिल्ली)वि.वि.लालरीना रेथेई(मिझोराम)4-2(85(56)-25, 56-46, 35-60, 69-26, 41-57, 89(89)-00);

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...