ज्युनियर स्नूकरमध्ये कर्नाटकाच्या कीर्थना पंडियन हिला विजेतेपद

Date:

पुणे: बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या वतीने आयोजित व मनिषा कन्स्ट्रक्शन आणि व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड प्रायोजित मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्ड्स व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत ज्युनियर स्नूकर मुलींच्या गटात कर्नाटकाच्या कीर्थना पंडियन तामिळनाडूच्या अनुपमा रामचंद्रनचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत ज्युनियर(21वर्षाखालील)स्नूकर मुलींच्या गटात अंतिम फेरीत कर्नाटकाच्या कीर्थना पंडियन हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तामिळनाडूच्या अनुपमा रामचंद्रनचा 3-0(61-31, 59-18, 60-50) असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. वर्षीय कीर्थना हि कर्नाटक राज्य बिलियर्ड्स संघटना येथे प्रशिक्षक सी. रवींद्रनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. याआधी मध्ये कीर्थना हिने आयबीएसएफ जागतिक वर्षाखालील स्नूकर स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते.

तिसऱ्या व चौथ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत  मध्यप्रदेशच्या इशिका शहा हिने आपलीच राज्य सहकारी कानिशा जूरानीचा 2-0(64-30, 53-01) असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला.

वरिष्ठ स्नूकर गटात राउंड रॉबिन फेरीत मानांकित खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर सहज विजय मिळविले. अ गटात आरएसपीबीच्या पंकज अडवानी याने पश्चिम बंगालच्या मनीष जैनचा 4-0(99(56)-00, 131(94)-00, 64-37, 67(54)-27) असा एकतर्फी पराभव केला. पंकज याने पहिल्या, दुसऱ्या व चौथ्या फ्रेममध्ये अनुक्रमे 56, 94 व 54 गुणांचा ब्रेक नोंदविला. बी गटात आरएसपीबीच्या लक्ष्मण रावत याने मध्यप्रदेशच्या ह्रितिक जैनचा 4-1(18-74, 68-40, 63-45, 66-25, 65-43) असा तर, महाराष्ट्राच्या क्रिश गुरबक्षानी याने पंजाबच्या मनदीप सिंगचा 4-2(54-58, 20-61, 57-27, 65-39, 79-01, 69-58)असा संघर्षपूर्ण पराभव केला.

याआधी ज्युनियर मुलींच्या स्नूकर गटांतील विजेत्यांना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिके वितरण माजी बॅडमिंटन गायत्री वर्तक-मडकेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सलील देशपांडे, राजवर्धन जोशी आणि अजय रस्तोगी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: ज्युनियर(21वर्षाखालील) स्नूकर मुली: उपांत्य फेरी:

अनुपमा रामचंद्रन(तामिळनाडू)वि.वि.कानिशा जूरानी(मध्यप्रदेश) 2-1(62-37, 40-57, 59-36);

कीर्थना पंडियन(कर्नाटक)वि.वि.इशिका शहा(मध्यप्रदेश)2-1(50-38, 65-82, 62-45);

अंतिम फेरी: कीर्थना पंडियन(कर्नाटक)वि.वि.अनुपमा रामचंद्रन(तामिळनाडू)3-0(61-31, 59-18, 60-50);

तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी: इशिका शहा(मध्यप्रदेश)वि.वि.कानिशा जूरानी(मध्यप्रदेश)2-0(64-30, 53-01);

 

वरिष्ठ स्नूकर मुले: राउंड रॉबिन फेरी:

गट अ: पंकज अडवानी(आरएसपीबी)वि.वि.मनीष जैन(पश्चिम बंगाल)4-0(99(56)-00, 131(94)-00, 64-37, 67(54)-27);

गट अ: पारस गुप्ता(उत्तरप्रदेश)वि.वि.आदित्य अगरवाल(आरएसपीबी)4-0(60-56, 111(55)-20, 94(52)-01, 67-63);

गट ब: सुश्रुत दास(ओडिशा)वि.वि.शोएब खान(दिल्ली)4-1(36(36)-93(48,45), 64-40, 70(38)-13, 54-40, 70(41,28)-07);

गट ब: लक्ष्मण रावत(आरएसपीबी)वि.वि.ह्रितिक जैन(मध्यप्रदेश)4-1(18-74, 68-40, 63-45, 66-25, 65-43);

गट क: विजय निचानी(तामिळनाडू)वि.वि.रजत खनेजा(हरयाणा)4-0(68-22, 66-55, 67-21, 65-53);

गट क: आदित्य मेहता(पीएसपीबी)वि.वि.विनायक अगरवाल(उत्तरप्रदेश)4-0(69-18, 58-27, 72(61)-04, 114(69)-01);

गट ड: कमल चावला(आरएसपीबी)वि.वि.सिद्धार्थ पारीख(आरएसपीबी)4-0(72(56)-11, 66(51)-35, 53-45, 78(77)-34);

गट ड:क्रिश गुरबक्षानी(महाराष्ट्र)वि.वि.मनदीप सिंग(पंजाब)4-2(54-58, 20-61, 57-27, 65-39, 79-01, 69-58);

गट ग: ध्व्ज हरिया(पीएसपीबी)वि.वि.मोहम्मद शोएब खान(पश्चिम बंगाल)4-1(75(75)-00, 83-42, 77(58)-10, 22-56, 75-44);

गट फ: नीरज कुमार(आरएसपीबी)वि.वि.संदीप गुलानी(दिल्ली)4-2(54-42, 71-34, 18-69, 47-40, 06-87(61), 57(56)-45);

गट फ: आयुष कुमार(पंजाब)वि.वि.ध्रुव वर्मा(पंजाब)4-2(37-71, 83-19, 69-62, 61-08, 54-69, 76-07);

गट ह:दिग्विजय कडीयन(हरयाणा)वि.वि.योगेश कुमार(कर्नाटक)4-1(53-42, 74(74)-17, 62-42, 23-66, 99(99)-00);

गट ज: पुष्पेंदर सिंग(आरएसपीबी)वि.वि.मलकीत सिंग(आरएसपीबी)4-1(75-01, 32-63, 73-34, 57-16, 72-05);

गट ज: दिव्या शर्मा(हरयाणा)वि.वि.सुरज राठी(महाराष्ट्र)4-2(112(59,45)-00, 38-46, 63-53, 08-52, 72(53)-38, 70-56).

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सर्व धर्मीय ख्रिसमस स्नेह मेळावा संपन्न

पुणे; पुण्यातील येरवडा – शास्त्रीनगर भागातील सेक्रेड हार्ट चर्च येथे...

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जास्तीत जास्त दर देण्याचा विचार•...

राज बब्बर,रमेश बागवे, मोहन जोशी,वसंत पुरकेंसह काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर.

मुंबई, दि. २३ डिसेंबर २०२५ राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस...

सत्तेच्या लोभी राजकारणाला आम आदमी पार्टी शह देईल..अरविंद केजरीवाल,भगवंत मान पुण्यात प्रचाराला येणार

पुणे- ' महाराष्ट्रात प्रस्थापित राजकीय पक्षांनी विचारधारा सोडून सामान्य...