स्नूकरमध्ये कनिशा जूरानी, कीर्थना पंडियन, इशिका शहा, अनुपमा रामचंद्रन यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

Date:

वरिष्ठ स्नूकरमध्ये शिवम अरोरा, तहा खान, हसन बदामी, सुरज राठी यांचा मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश

पुणे: बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या वतीने आयोजित व मनिषा कन्स्ट्रक्शन आणि व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड प्रायोजित मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्ड्स व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत ज्युनियर स्नूकर मुलींच्या गटात कनिशा जूरानी, कीर्थना पंडियन, इशिका शहा, अनुपमा रामचंद्रन या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत ज्युनियर(21वर्षाखालील)स्नूकर मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत मध्यप्रदेशच्या कानिशा जूरानी हिने तामिळनाडूच्या मरिअम अग्निशचा 2-0(36-21, 48-22)असा एकतर्फी पराभव करून उपांत्य फेरी गाठली. कर्नाटकाच्या कीर्थना पंडियन हिने मध्यप्रदेशच्या टीमसी गुप्ताचा 2-1(73-33, 50-74, 39-31) असा संघर्षपूर्ण पराभव केला. मध्यप्रदेशच्या इशिका शहा हिने आपलीच राज्य सहकारी तन्वी गौहरचे आव्हान 2-0(62-31, 64-18) असे संपुष्टात आणले.

वरिष्ठ स्नूकर गटात डबल एलिमिनेशन फेरीत ग गटात आरएसपीबीच्या सिद्धार्थ पारीख याने महाराष्ट्राच्या मानव पंचालचा 3-0(93-04, 62-52, 51-15) असा तर, ह गटात महाराष्ट्राच्या शिवम अरोरा याने हरयाणाच्या मेहुलचा 3-1(75(42)-27, 17-54, 72-04, 61-44) असा पराभव करून मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश केला. याच गटात महाराष्ट्राच्या तहा खान याने जम्मु व काश्मीरच्या विदित बरडीचा 3-2(37-83, 69-49, 61-38, 53-64, 71-24)असा संघर्षपूर्ण पराभव करून मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळविले. अ गटात महाराष्ट्राच्या सुरज राठी याने आरएसपीबीच्या फैजल खानला 3-0(57-43, 57-24, 56-31) असे पराभूत करून मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश केला.

याशिवाय विजय निचानी(तामिळनाडू), मनदीप सिंग(पंजाब), मोहम्मद शोएब खान(पश्चिम बंगाल), आशुतोष पाधी(ओरिसा), हसन बदामी(महाराष्ट्र), अनुज उप्पल(दिल्ली), अनमोलदीप सिंग(पंजाब), धार्मिन्दर लिली(पंजाब), आयुष कुमार(पंजाब), दिग्विजय कडीयन(हरयाणा), शोएब खान(दिल्ली), पुष्पेंदर सिंग(आरएसपीबी) या खेळाडूंनी देखील वरिष्ठ स्नूकरच्या मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश केला आहे.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: ज्युनियर(21वर्षाखालील) स्नूकर मुली: उपांत्यपूर्व फेरी:

अनुपमा रामचंद्रन(तामिळनाडू)वि.वि.मनस्विनी एस(तामिळनाडू)2-0(54-16, 56-10);

कानिशा जूरानी(मध्यप्रदेश)वि.वि.मरिअम अग्निश(तामिळनाडू)2-0(36-21, 48-22);

कीर्थना पंडियन(कर्नाटक)वि.वि.टीमसी गुप्ता(मध्यप्रदेश)2-1(73-33, 50-74, 39-31);

इशिका शहा(मध्यप्रदेश)वि.वि.तन्वी गौहर(मध्यप्रदेश)2-0(62-31, 64-18);

वरिष्ठ स्नूकर मुले: डबल एलिमनेशन फेरी:

गट अ: सुरज राठी(महाराष्ट्र)वि.वि.फैजल खान(आरएसपीबी)3-0(57-43, 57-24, 56-31);

गट ड: एमएस अरुण(कर्नाटक)वि.वि.चिराग रामकृष्णा(महाराष्ट्र)3-1(62-44, 17-73(44), 65(56)-08, 56(38)-53);

गट क: अनुज उप्पल(दिल्ली)वि.वि.मनीष जैन(पश्चिम बंगाल)3-1(74(68)-01, 41-63, 95(81)-14, 59-23;

गट क:  पियुष कुशवाला(मध्यप्रदेश)वि.वि.के. वेंकटेशाम(आरएसपीबी)3-2(66-56, 13-63, 62-55, 06-75, 71-31);

गट क: अनमोलदीप सिंग(पंजाब)वि.वि.विश्वजित मोहन(उत्तरप्रदेश)3-1(64-29, 52-35, 45-71, 65-20);

गट ड: वरून कुमार(तामिळनाडू)वि.वि.निलेश चव्हाण 3-1(70-58, 60-38, 21-74, 70(56)-41);

गट ड: अवनीश कुमार(दिल्ली)वि.वि.ह्रितिक जैन(मध्यप्रदेश)3-1(51-76, 96(65)-16, 75(22)-07, 65(45)-34;

गट ड: आदित्य अगरवाल(आरएसपीबी)वि.वि.अर्शद झामा(पश्चिम बंगाल)3-2(49-53, 56-75, 83-05, 56-13, 45-31);

गट फ: खिजार रौफ(तेलंगणा)वि.वि.शिव शर्मा(आंध्रप्रदेश)3-0(87(71)-40, 56-25, 68-24);

गट फ: दिग्विजय कडीयन(हरयाणा)वि.वि.रोविन डिसुझा(आरएसपीबी)3-0(60-48, 68-45, 56-19);

गट ग: लालरीना आर.(मिझोराम)वि.वि.युनिस कुची(जम्मू-काश्मीर)3-2(68-17, 65-25, 22-76, 27-70, 71-38);

गट ग: आयुष कुमार(पंजाब)वि.वि.अनुज भार्गवा(उत्तरप्रदेश)3-2(73-30, 68-37, 40-70, 31-54, 57-24);

गट ग: सिद्धार्थ पारीख(आरएसपीबी)वि.वि.मानव पंचाल(महाराष्ट्र)3-0(93-04, 62-52, 51-15);

गट ह: शिवम अरोरा(महाराष्ट्र)वि.वि.मेहुल(हरयाणा)3-1(75(42)-27, 17-54, 72-04, 61-44);

गट ह: तहा खान(महाराष्ट्र)वि.वि.विदित बरडी(जम्मू-काश्मीर)3-2(37-83, 69-49, 61-38, 53-64, 71-24);

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५ बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६,...