
तिसऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत मॅथ्यू एबडनचा अव्वल मानांकित खेळाडूवर विजय
पुणे- एमएसएलटीए तर्फे आयोजित तिसऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत ऑस्ट्रेलियाच्या बिगर मानांकित मॅथ्यू एबडन याने चीनच्या अव्वल मानांकित झांग झीझेन याचा पराभव करत खळबळजनक निकालाची नोंद केली. रॉबर्टो मार्कोरा, ब्लेझ रोला, विक्टर ट्रोकी, रॉबिन हासे , लुकास रोझोल, इव्हगेनी कार्लोव्हस्की यांनी पहिल्या पात्रता फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांच्या पराभव करत पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीच्या सामन्यात 58 मिनिट चाललेल्या सामन्यात इटलीच्या सातव्या मानांकित रॉबर्टो मार्कोरा याने आपल्याच देश सहकारी फिलिपो बाल्दी याचा 6-3,6-2 असा सरळ सेटमध्ये एकतर्फी लढतीत पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.
56 मिनिट चाललेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या बिगर मानांकित मॅथ्यू एबडन याने चीनच्या अव्वल मानांकित झांग झीझेन याचा 6-3,6-2 असा सहज पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. एकतर्फी लढतीत विजय मिळवून दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश केला. 2 तास 57 मिनिट चाललेल्या अटीतटिच्या लढतीत स्लोव्हेनियाच्या दुसऱ्या मानांकित ब्लेझ रोला याने ट्युनिशियाच्या मलेक जाझिरी याचा 6-7(5),7-6(6),7-6(2) असा संघर्षपूर्ण पराभव करून दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश केला.
2 तास 32 मिनिट चाललेल्या सामन्यात रशियाच्या इव्हगेनी कार्लोव्हस्की याने रशियाच्याचअस्लान करातसेव्ह याचा 4-6, 6-4, 6-4 असा पराभव करत पात्रता फेरीच्या दुसऱ्या पर्वात प्रवेश केला. झेकियाच्या आठव्या मानांकित लुकास रोझोल याने लाटवियाच्या अर्नेस्ट्स गुलबिस याचा 6-4,6-4 असा तर सर्बियाच्या पाचव्या मानांकित विक्टर ट्रोकी याने स्पेनच्या निकोल कुहान याचा 6-1,6-4 असा पराभव करत दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- पहिली पात्रता फेरी
रॉबर्टो मार्कोरा (इटली)(7) वि वि फिलिपो बाल्दी (इटली) 6-3,6-2
मॅथ्यू एबडन (ऑस्ट्रेलिया) वि वि झांग झीझेन (चीन)(1) 6-3,6-2
ब्लेझ रोला (स्लोव्हेनिया)(2) वि वि मलेक जाझिरी (ट्युनिशिया) 6-7(5),7-6(6),7-6(2)
रॉबिन हासे (नेदरलँड्स)(6)वि वि फ्रेडेरिको फेरेरा सिल्वा (पोर्तुगाल) 3-6,7-6(5), 6-4
इव्हगेनी कार्लोव्हस्की(रशिया) वि वि अस्लान करातसेव्ह (रशिया) 4-6, 6-4, 6-4
लुकास रोझोल (झेकिया)(8) वि वि अर्नेस्ट्स गुलबिस (लाटविया) 6-4,6-4
विक्टर ट्रोकी (सर्बिया)(5) वि वि निकोल कुहान (स्पेन) 6-1,6-4