पुणे: बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या वतीने आयोजित व मनिषा कन्स्ट्रक्शन आणि व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड प्रायोजित मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्ड्स व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सब-ज्युनियर स्नूकर मुलींच्या गटात तामिळनाडूच्या अनुपमा रामचंद्रन आणि कर्नाटकच्या किर्थना पंडियन या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत सब-ज्युनियर(18वर्षाखालील)स्नूकर मुलींच्या गटात उपांत्य फेरीत तामिळनाडूच्या अनुपमा रामचंद्रन हिने गुजरातच्या आन्या पटेलचा 2-0(48-15, 78-52) असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत कर्नाटकच्या किर्थना पंडियन हिने तामिळनाडूच्या मोहिताचा 2-0(50-10, 78(63)-09) असा सहज पराभव करून दिमाखात अंतिम फेरी गाठली.
वरिष्ठ स्नूकर गटात डबल एलिमनेशन फेरीत अ गटात पुण्याच्या राजवर्धन जोशी याने चंदीगडच्या सिमरन दीपचा 3-2(38-51, 54-40, 55-21, 05-60, 64-14) असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. ब गटात महाराष्ट्राच्या हसन बदामी याने मध्यप्रदेशच्या भरत सिसोडियाचा 3-0(72-15, 78-18, 73-18) असा एकतर्फी पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: सब-ज्युनियर(18वर्षाखालील)स्नूकर मुली: उपांत्य फेरी:
अनुपमा रामचंद्रन(तामिळनाडू)वि.वि.आन्या पटेल(गुजरात) 2-0(48-15, 78-52);
किर्थना पंडियन(कर्नाटक)वि.वि.मोहिता(तामिळनाडू) 2-0(50-10, 78(63)-09);
ज्युनियर(21वर्षाखालील) बिलियर्ड्स मुली: बाद फेरी:
सेनेथ्रा बाबू(तामिळनाडू)वि.वि.शिविना ठाकूर(मध्यप्रदेश) 81-39;
आन्या पटेल(गुजरात)वि.वि.तिमसी गुप्ता(मध्यप्रदेश)74-88;
अनुपमा रामचंद्रन(तामिळनाडू)वि.वि.श्रेया दुबे(मध्यप्रदेश) 100-60;
कनिशा झुराणी(मध्यप्रदेश)वि.वि.मोहिता आरटी(तामिळनाडू) 141-79;
वरिष्ठ स्नूकर: डबल एलिमनेशन फेरी:
गट अ: राजवर्धन जोशी(आयबीएसएफ)वि.वि.सिमरन दीप(चंदीगड) 3-2(38-51, 54-40, 55-21, 05-60, 64-14);
गट ब: हसन बदामी(महाराष्ट्र)वि.वि.भरत सिसोडिया(मध्यप्रदेश) 3-0(72-15, 78-18, 73-18);
गट ड: अर्षद झानिया(पश्चिम बंगाल)वि.वि.लकी वटनानी(तेलंगणा) 3-0(76-75, 72(61)-47, 72-59);
गट ड: आदित्य अगरवाल(आरएसपीबी)वि.वि.जे.वरून कुमार(तामिळनाडू) 3-1(73-30, 26-92, 96(52)-33, 75(43,21)-15);
