पुणे: आयसीएआयच्या पश्चिम विभागीय पुणे शाखेतर्फे आयोजीत सातव्या गोवर्धन सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2020 स्पर्धेत रॉयल्स, एसआरपीए इलेव्हन व स्टॅलिअन्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली.
कटारिया हायस्कुल क्रिकेट मैदान, मुकुंदनगर येथे आजपासून सुरू झालेल्या स्पर्धेत सौरभ सोनीच्या दमदार 35 धावांच्या बळावर रॉयल्स संघाने पीएचएम टायगर्स संघाचा 12 धावांनी पराभव करत उद्घाटनाचा दिवस गाजवला. पहिल्यांदा खेळताना सौरभ सोनीच्या 35, कुणाल झामवारच्या 16 व समिर बिर्लाच्या 12 धावांसह रॉयल्स संघाने 8 षटकात 5 बाद 89 धावा केल्या. 89 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सागर ढवळे व निपुण भंडारी यांच्या अचूक गोलंदाजीपुढे पीएचएम टायगर्स संघ 8 षटकात 4 बाद 77 धावांत गारद झाला. सौरभ सोनी सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत अजित पवारच्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर एसआरपीए इलेव्हन संघाने सीए चॅम्प्स संघाचा 2 धावांनी पराभव करत निसटता विजय मिळवला. पहिल्यांदा खेळताना ब्रीजभुषण तिवारीच्या नाबाद 39 व अजित पवारच्या 30 धावांसह एसआरपीए इलेव्हन संघाने 8 षटकात 4 बाद 91 धावा केल्या. 91 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सीए चॅम्प्स संघाने कडवी झुंज देत 8 षटकात 6 बाद 89 धावा केल्या. मात्र संघाला विजय मिळाला नाही. यात आत्मन बगमारने 26 व अमित बलदोटाने 22 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. अजित पवारने 14 धावात 3 गडी बाद केले. अजित पवार सामनावीर ठरला.
अन्य लढतीत हितेश हरवानीच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर स्टॅलिअन्स संघाने किर्तने ऑड पंडित संघाचा 20 धावांनी पराभव करत विजय मिळवला. लोकेश नाहरच्या अष्टपैलु कामगिरीसह पेशवा सुपर किंग्स संघाने एसपीसीएम स्ट्रायकर्स संघाचा 2 धावांनी पराभव केला.
स्पर्धेचे उद्घाटन डब्लूआयआरसी ऑफ आयसीएआयचे माजी उपाध्यक्ष सीए सर्वेश जोशी आणि पुणे विभागाच्या अध्यक्षा ऋता चितळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सीए अभिषेक धमाने, सीए सचिन पारख आणि सीए योगेश पोद्दार आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
रॉयल्स- 8 षटकात 5 बाद 89 धावा(सौरभ सोनी 35(21), कुणाल झामवार 16(9), समिर बिर्ला 12(8), शुभंकर कुलकर्णी 2-9, मृगांक साळुंके 1-26) वि.वि पीएचएम टायगर्स- 8 षटकात 4 बाद 77 धावा(रुद्रांग 18(13), अक्षय ओक 16(11), रोहित मेहेंदळे नाबाद 13(6), सागर ढवळे 2-21, निपुण भंडारी 1-17) सामनावीर- सौरभ सोनी
रॉयल्स संघाने 12 धावांनी सामना जिंकला.
एसआरपीए इलेव्हन- 8 षटकात 4 बाद 91 धावा(ब्रीजभुषण तिवारी नाबाद 39(22), अजित पवार 30(15), आत्मन बगमार 2-11, सुहास कौलवार 1-13) वि.वि सीए चॅम्प्स- 8 षटकात 6 बाद 89 धावा(आत्मन बगमार 26(14), अमित बलदोटा 22(13), अमोल कुलकर्णी 16(10), अजित पवार 3-14) सामनावीर- अजित पवार
एसआरपीए इलेव्हन संघाने 2 धावांनी सामना जिंकला.
स्टॅलिअन्स- 8 षटकात 4 बाद 81 धावा(साहिल पारख 34(23), हितेश हरवानी 24(20), अनुज जगताप 1-13, अमोद बेंद्रे 1-14) वि.वि किर्तने ऑड पंडित- 8 षटकात 6 बाद 61 धावा(आकाश कक्कर 16(13), प्रतिक पटेल 12(6), मिथुन भोईटे 12(9), अयुष तिवारी 2-10, रिषभ1-10 ) सामनावीर- हितेश हरवानी
स्टॅलिअन्स संघाने 20 धावांनी सामना जिंकला.
पेशवा सुपर किंग्स- 8 षटकात 8 बाद 76 धावा(लोकेश नाहर 28(11), अक्षय पुरंदरे 21(14), जुगल शहा 12(8), ऋषभकुमार भंडारी 4-11, ओमकार कटारीया 2-8) वि.वि एसपीसीएम स्ट्रायकर्स- 8 षटकात 5 बाद 74 धावा(ऋषभकुमार भंडारी 44(26), संकेत नाहटा नाबाद 25(17), लोकेश नाहर 2-11) सामनावीर- लोकेश नाहर
पेशवा सुपर किंग्स संघाने 2 धावांनी सामना जिंकला.

