एस. श्रीकृष्णा, ध्रुव चावला, क्रिश गुरबक्षानी, रयान राझमी यांचा सलग दुसरा विजय

Date:

पुणे: बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) व पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व मनिषा कन्स्ट्रक्शन आणि व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड प्रायोजित मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्ड्स व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत ज्युनियर(21वर्षाखालील) स्नूकरमध्ये मुलांच्या गटात एस.श्रीकृष्णा, क्रिश गुरबक्षानी, रयान राझमी, ध्रुव चावला या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून सलग दुसरा विजय नोंदविला.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत ज्युनियर(21 वर्षाखालील) स्नूकर गटात गटसाखळी फेरीत पीएसपीबीच्या एस. श्रीकृष्णा याने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत महाराष्ट्राच्या पिनाक अनपचा 3-0(72-54, 77(57)-21, 100(60,40)-08) असा एकतर्फी पराभव केला. याच गटात महाराष्ट्राच्या  क्रिश गुरबक्षानी याने पश्चिम बंगालच्या कबीर शर्मावर 3-1(64-24, 80-14, 49-69, 68-53 असा विजय मिळवला. के गटात ओडिशाच्या अबिनाश मोहपात्रा याने पिछाडीवरून जोरदार कमबॅक करत कर्नाटकच्या दानिश खानचा 3-2(29-52, 40-51, 65-39, 73-40, 52-44) असा संघर्षपूर्ण पराभव केला.

ख गटात पंजाबच्या ध्रुव चावला याने कडवी झुंज देत तेलंगणाच्या मोहम्मद फैजलचा 3-2(47-38, 15-73, 27-57, 66-19, 62-02) असा पराभव करून दुसऱ्या विजयाची नोंद केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: ज्युनियर(21 वर्षाखालील) स्नूकर मुले: गट साखळी फेरी:

गट क: करमेश पटेल(गुजरात)वि.वि.अमन ठाकेर(झारखंड)3-0(64-21, 65-18, 72-26);

गट अ: शोएब खान(दिल्ली)वि.वि.सत्यन श्रीहरी(मध्यप्रदेश)3-0(62-45, 69(58)-13, 88(54)-35);

गट ब: क्रिश गुरबक्षानी(महाराष्ट्र)वि.वि.कबीर शर्मा(पश्चिम बंगाल)3-1(64-24, 80-14, 49-69, 68-53;

गट ब:आमिर खान(उत्तरप्रदेश) वि.वि.जय चोपडा(गोवा)3-0(55-02, 46-19, 59-29);

गट ब: एस. श्रीकृष्णा(पीएसपीबी)वि.वि.पिनाक अनप(महाराष्ट्र)3-0(72-54, 77(57)-21, 100(60,40)-08);

गट क: मेहुल सैनी(हरियाणा)वि.वि.भवनीत वालिया(पंजाब)3-2(68-39, 32-62, 78-61, 17-63, 66-44);

गट ड: विश्वजीत मोहन(उत्तरप्रदेश)वि.वि.कुंज पटेल(गुजरात)3-2(13-50, 61-12, 29-61, 73-26, 108-88);

गट ड: रणवीर सिंग मारवा(गुजरात)वि.वि.जशन बेहल(पंजाब)3-2(63-37, 72-30, 41-77, 38-64, 67(50)-10);

गट ई: ऍड्रिन मोसेस(कर्नाटक)वि.वि.समीर कुमार(झारखंड)3-0(49-08, 48-11, 55-38);

गट फ: इरफान अख्तर व्हीएम(केरळ)वि.वि.आनंद बोरात(गोवा)3-0(47-35, 54-18, 47-24);

गट ग: रयान राझमी(महाराष्ट्र)वि.वि.जीत भोगणी(गुजरात)3-1(68(41)-13, 16-68(47), 66-18, 81-00);

गट ग: अमन बनसोड(मध्यप्रदेश)वि.वि.गौरव मल्होत्रा(हरियाणा)3-1(50-10, 54-71, 56-30, 70-08);

गट ह: रणवीर दुग्गल(चंदीगड)वि.वि.गौरव छाब्रा(मध्यप्रदेश)3-0(53-07, 55-50, 79-27);

गट ह: मुश्ताक खान(तेलंगणा)वि.वि.अली रजा खान(पश्चिम बंगाल)3-0(59-08, 73-34, 77(53)-17);

गट इ: दिग्विजय कडीयन(हरियाणा)वि.वि.हेत पटेल(गुजरात) 3-1(71-06, 65-30, 26-66, 74-34);

गट जे: वरून कुमार(कर्नाटक)वि.वि.स्पर्श फेरवानी(महाराष्ट्र)3-1(32-64, 71-18, 62-13, 65-43);

गट जे: अर्ष्णुर सिंग(हरियाणा)वि.वि.गौथम प्रसाद(आंध्रप्रदेश)3-0(45-35, 63-26, 59-30);

गट ख: ध्रुव चावला(पंजाब)वि.वि.मोहम्मद फैजल(तेलंगणा)3-2(47-38, 15-73, 27-57, 66-19, 62-02);

गट न:प्रियांश जैन(पश्चिम बंगाल)वि.वि.जीत वसानी(झारखंड)3-2(18-73, 36-66, 57-01, 49-26, 72-09);

गट प: ध्रुव पटेल(गुजरात)वि.वि.बरून नाईक(ओडिशा)3-0(72-40, 57-22, 60-48);

गट प: उमर उल इस्लाम(जम्मू व काश्मीर)वि.वि.अमल रझाक(केरळ)3-0(55-22, 60-22, 79-47);

गट के: अबिनाश मोहपात्रा(ओडिशा)वि.वि.दानिश खान(कर्नाटक) 3-2(29-52, 40-51, 65-39, 73-40, 52-44).

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

येरवडा कारागृहात 5 मोबाईल,2 पॉवर बँक,चार्जिंग वायर सापडली..

पुणे- येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न...

माझी गाणी आजही रसिकांच्या पसंतीत -सिनेगीतकार समीर अंजान

'एमआयटी एडीटी' विद्यापीठाच्या 'पर्सोना महोत्सवा'ची उत्साहात सांगता लोणी-काळभोर (पुणे)...

अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धेत सलग दहा वर्षे विजेतेपदाची परंपरा कायम!

पिंपरी चिंचवड महापालिकेचा दणदणीत विजयपिंपरी : पुणे आंतर कचेरी...