- सांघिक गटात बीएसएफ , पंजाब या संघांचा सुवर्णवेध
पिंपरी चिंचवड: महाराष्ट्र पोलीस यांच्या वतीने 13व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी(क्रीडा)स्पर्धेत पुरूषांच्या 50 मीटर फ्री रायफल 3 पोझीशन प्रकारात सीआरपीच्या मिलान खान याला तर महिलांच्या 10मीटर एअर पिस्टल प्रकारात पंजाबच्या किरणदिप कौरने सुवर्णपदक पटकावले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरूषांच्या 50 मीटर फ्री रायफल 3 पोझीशन प्रकारात सीआरपीच्या मिलान खानने सर्वाधीक 572,22X गुण मिळवत सुवर्णपदक पटकवले, बीएसएफच्या विमलेश कुमार राठोरने 572,20X गुणांसह रौप्य तर सीआरपीच्या रितेश तन्वरने 572,16X गुणासह कांस्य पदकाची कमाई केली. सांघिक गटात बीएसएफ संघाने 1711 गुणांसह सुवर्ण पदक पटकावले. यात विमलेश कुमार राठोरने 572,झुतन मोडकने 570 व अनिल कुमारने 569 गुम मिळवले. सीआरपी संघाने 1705 गुणासह रौप्य तर एसएसबी संघाने 1696 गुणांसह कांस्य पदक पटकावले.