सब-ज्युनियर(18 वर्षाखालील) स्नूकरमध्ये क्रिश गुरबकसानी, सुमेर मागो, रणवीर दुग्गल, दिग्विजय कडीयन यांचा उपांत्य फेरीत प्रवेश
पुणे,16 जानेवारी 2020: बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) व पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व मनिषा कन्स्ट्रक्शन आणि व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड प्रायोजित मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्ड्स व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत ज्युनियर(21वर्षाखालील) बिलियर्ड्स मुलांच्या गटात पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डच्या एस.श्रीकृष्णा याने या गटांतील विजेतेपदाबरोबरच आपले राष्ट्रीय स्पर्धेतील ज्युनियर बिलियर्ड्समधील सलग पाचवे विजेतेपद संपादन केले.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत ज्युनियर(21 वर्षाखालील) बिलियर्ड्स गटात राउंड रॉबिन फेरीत सध्याच्या कुमार व वरिष्ठ बिलियर्ड्स विजेता पीएसपीबीच्या एस. श्रीकृष्णा याने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत स्पर्श फेरवानीचा 989-338 असा पराभव करून सलग चौथ्या विजयासह या गटाचे विजेतेपद संपादन केले. श्रीकृष्णा याने आपल्या खेळीत 130, 126 गुणांचा ब्रेक देखील नोंदविला. यावेळी विजेतेपदानंतर बोलताना श्रीकृष्णा म्हणाला की, एकूणच ही स्पर्धा माझ्यासाठी उत्तम ठरली. आता ज्युनियर बिलियर्ड्स स्पर्धेनंतर ज्युनियर स्नूकर स्पर्धा आणि त्यानंतर वरिष्ठ बिलियर्ड्समध्ये मुख्य फेरीत खेळणार आहे. त्यामुळे या स्पर्धेतील अनुभवाचा मला वरिष्ठ स्पर्धेत नक्कीच उपयोग होणार आहे. माझे हे ज्युनियर बिलियर्ड्समधील पाचवे राष्ट्रीय विजेतेपद आहे. श्रीकृष्णा हा चेन्नई येथे म्यालापोर क्लब येथे प्रशिक्षक आपले वडील एन सूर्यनारायणन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. तर, महाराष्ट्राच्या रयान राझमी याने हरयाणाच्या दिग्विजय कडीयनचा 554-461 असा पराभव करून उपविजेतेपद पटकावले.
सब-ज्युनियर(18वर्षाखालील)मुलांच्या गटात स्नूकरमध्ये उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राच्या क्रिश गुरबकसानी याने पश्चिम बंगालच्या प्रियांश जैनचा 3-1(93(93)-01, 69-66, 47-55, 63-31) असा पराभव करून दिमाखात उपांत्य फेरी गाठली. क्रिश याने आपल्या खेळीत पहिल्याच फ्रेममध्ये 93 गुणांचा ब्रेक नोंदविला. क्रिश हा आर डी नॅशनल कॉलेज मध्ये वाणिज्य शाखेत एसवायजेसीत शिकत खार जिमखाना येथे प्रशिक्षक यासिन मर्चंट यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याने याआधी गतवर्षी इंदोर येथील राष्ट्रीय सब-ज्युनियर स्नूकर स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. महाराष्ट्राच्या सुमेर मागो याने कडवी झुंज देत तेलंगणाच्या विभास कडीयपूचा 3-2(16-57, 61-21, 43-56, 67-30, 60-16) असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: राउंड रॉबिन: ज्युनियर(21वर्षाखालील)बिलियर्ड्स मुले:
एस. श्रीकृष्णा(पीएसपीबी)वि.वि.स्पर्श फेरवानी(महाराष्ट्र) 989-338;
रयान राझमी(महाराष्ट्र)वि.वि.दिग्विजय कडीयन(हरयाणा) 554-461;
सब-ज्युनियर(18वर्षाखालील) स्नूकर मुले: उपांत्यपूर्व फेरी:
रणवीर दुगगल(चंदीगड)वि.वि.रयान राझमी(महाराष्ट्र) 3-2(53-48, 16-52, 07-66, 74-41, 54-46);
सुमेर मागो(महाराष्ट्र)वि.वि.विभास कडीयपू(तेलंगणा) 3-2(16-57, 61-21, 43-56, 67-30, 60-16);
दिग्विजय कडीयन(हरयाणा)वि.वि.शयान राझमी(महाराष्ट्र) 3-0(53-34, 58-40, 63-29);
क्रिश गुरबकसानी(महाराष्ट्र)वि.वि.प्रियांश जैन(पश्चिम बंगाल) 3-1(93(93)-01, 69-66, 47-55, 63-31);
ज्युनियर(21वर्षाखालील)स्नूकर मुले: पहिली पात्रता फेरी:
अर्ष्णूर सिंग(हरयाणा)वि.वि.अमन कुमार(झारखंड)3-0(57-14, 53-15, 56-09);
वैभव चौगुले(तामिळनाडू)वि.वि.मयंक राणा(दिल्ली)3-0(53-26, 55-43, 77-65);
महेंद्र चौहान(मध्यप्रदेश)वि.वि.साहेब सिंग(पंजाब)3-1(22-48, 66-62, 72-06, 74-09);
बरून सिंग(पंजाब)वि.वि.द्रन पांचाळ(गुजरात) 3-1(26-58, 54-43, 72-17, 66-27);
सईद मोहम्मद माझ अली(तेलंगणा)वि.वि.हरी प्रसाद(आंध्रप्रदेश) 3-2(51-70, 27-59, 62-17, 66-44, 50-21);
आदेश कोठारी(तामिळनाडू)वि.वि.पार्थ शहा(गुजरात) 3-0(61-42, 59-14, 72-20).