मनिषा-व्हॅस्कॉनबिलियर्ड्स व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पीएसपीबीच्या एस. श्रीकृष्णा याचा सनसनाटी विजय

Date:

पुणे,बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) व पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व मनिषा कन्स्ट्रक्शन आणि व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड प्रायोजित मनिषा-व्हॅस्कॉन  बिलियर्ड्स व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत ज्युनियर(21 वर्षाखालील) बिलियर्ड्स गटात राउंड रॉबिन फेरीत एस. श्रीकृष्णा याने आपली विजयी मालिका कायम ठेवत सलग दुसरा विजय मिळवला.

 

पीवायसी हिंदू जिमखाना येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत ज्युनियर(21 वर्षाखालील) बिलियर्ड्स गटात राउंड रॉबिन फेरीत सध्याच्या कुमार व वरिष्ठ बिलियर्ड्स विजेता पीएसपीबीच्या एस. श्रीकृष्णा याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत महाराष्ट्राच्या रयान राझमीचा 754-462 असा पराभव केला. एस. श्रीकृष्णा याने आपल्या खेळीत स्पर्धेतील आतापर्यंतचा 211 गुणांचा हायेस्ट ब्रेक नोंदविला. दुसऱ्या सामन्यातदेखील एस. श्रीकृष्णा याने आपला रंगतदार खेळ सुरू ठेवत हरियाणाच्या दिग्विजय  कडीयनचा 680-81 असा पराभव करून सलग दुसरा विजय नोंदविला. अन्य लढतीत महाराष्ट्राच्या रयान राझमीने  आपलाच राज्य सहकारी स्पर्श  फेरवानीचा 700-381 असा पराभव करून विजय मिळवला.

सब-ज्युनियर(18वर्षाखालील) स्नूकर मुलांच्या गटात बाद फेरीत महाराष्ट्राच्या 14 वर्षीय शयान राझमी याने दिल्लीच्या रेहान मिश्राचा 2-0(60-11, 80-09) असा तर, महाराष्ट्राच्या सुमेर मागो याने मध्यप्रदेशच्या तात्या सचदेवचा 2-0(60-18, 73-09) असा पराभव करून उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: सब-ज्युनियर(18वर्षाखालील) स्नूकर मुले: बाद फेरी:

शयान राझमी(महाराष्ट्र)वि.वि.रेहान मिश्रा(दिल्ली)2-0(60-11, 80-09);

सी. हृतिक(तामिळनाडू)वि.वि.इरफान अख्तर(केरळ) 2-0(50-12, 54-43);

सुमेर मागो(महाराष्ट्र)वि.वि.तात्या सचदेव(मध्यप्रदेश) 2-0(60-18, 73-09);

विभास कडीयापू(तेलंगणा)वि.वि.मनकंवर सिंग(छत्तीसगड) 2-0(85-04, 66-11);

अर्ष्णूर सिंग(हरियाणा)वि वि.झुबिन झहीर(कर्नाटक) 2-0(67-39, 64-56);

उमर उल इस्लाम(जम्मू व काश्मीर)वि.वि.श्रेयांस देशलेहरा(मध्यप्रदेश) 2-1(41-63, 68-37, 73(41-42);

प्रणव नाथ(तामिळनाडू)वि.वि.अक्षत गुसेन(उत्तराखंड) 2-1(43-63, 86-74, 57-40);

रणवीर दुगगल(चंदीगड)वि.वि.विक्रम वीर सिंग(दिल्ली) 2-0(65-02, 65-18);

क्रिश गुरबकसानी(महाराष्ट्र)वि.वि.महेंद्र चौहान(मध्यप्रदेश) 2-0(75-08, 62-36);

रयान राझमी(महाराष्ट्र) वि.वि.सईद माझ अली(तेलंगणा) 2-0(76(54)-01, 67-60);

नाश्विन डिसुझा(गोवा)वि.वि.गौरव छाब्रा(मध्यप्रदेश) 2-0(61-49, 49-31);

प्रियांश जैन(पश्चिम बंगाल)वि.वि.कामरान मजीद(जम्मू व काश्मीर) 2-1(36-56, 62-32, 68-29);

पार्थ शहा(गुजरात) वि.वि. साक्षीत शर्मा(पंजाब) 2-1(18-56, 70-30, 45-44);

फॅबिन(कर्नाटक)वि.वि.सोहम कमानी(गुजरात) 2-0(73-32, 66-33);

गौरव मल्होत्रा(हरियाणा)वि.वि.ध्रुव पटेल(गुजरात) 2-1(55-43, 21-77, 50-13);

 

 

ज्युनियर(21 वर्षाखालील) बिलियर्ड्स मुले: राउंड रॉबिन:

स्पर्श फेरवानी(महाराष्ट्र)वि.वि.दिग्विजय कडीयन(हरियाणा)562-382;

एस. श्रीकृष्णा(पीएसपीबी)वि.वि.रयान राझमी(महाराष्ट्र)754-462;

एस. श्रीकृष्णा(पीएसपीबी)वि.वि.दिग्विजय कडीयन(हरियाणा) 680-81;

रयान राझमी(महाराष्ट्र)वि.वि.स्पर्श फेरवानी(महाराष्ट्र) 700-381.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शेअरमार्केट ट्रेडिंग नावाने १ कोटी ६० लाख रुपयांच्या फसवणुक करणा-या ६ भामट्यांना १२ दिवसांची कोठडी

पुणे-शेअरमार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करुन लाभांश देण्याचे बहाण्याने जेष्ठ नागरिकास...

‘सुशीला-सुजीत’ १८ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे, ता. ७: स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक यांच्या भूमिका...

विक्रमी वीजजोडण्यांमुळे महसूलात ५१३७ कोटींनी वाढ

महावितरणच्या पुणे परिमंडलामध्ये वीजहानीत घट पुणे, दि. ०७ एप्रिल २०२५: गेल्या...