एमएसएलटीए रवाईन हॉटेल अखिल भारतीय मानांकन 2लाख रकमेच्या पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या सालसा आहेरला दुहेरी मुकुटाचा मान

Date:

पाचगणी-रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या  एमएसएलटीए रवाईन हॉटेल अखिल भारतीय मानांकन  2लाख रकमेच्या पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत महिला गटात महाराष्ट्राच्या सालसा आहेरने एकेरी गटात तेलंगणाच्या  संस्कृती ढमेरा तर दुहेरी गटात  युब्रानी बॅनर्जीच्या साथीत  तेजस्वी काटे व श्रुष्टि दास यांचा पराभव करत दुहेरी मुकुट पटकावला. 
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत महिला गटात एकेरीत विजेतेपदाच्या लढतीत महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकीत सालसा आहेरने तेलंगणाच्या दुस-या मानांकीत संस्कृती ढमेराचा 6-1, 6-1 असा सहज पराभव करत एकेरीचे विजेतेपद पटकावले. 1 तास 10मिनिटे चाललेल्या लढतीत सालसाने सुरेख सुरुवात करत संस्कृतीची पहिल्याच गेममध्ये सर्व्हिस रोखली. या सेटमध्ये सालसाने निर्विवाद वर्चस्व राखत पुन्हा संस्कृतीची तिसऱ्या, सातव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-1 असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्येदेखील पिछाडीवर असलेल्या संस्कृतीला शेवटपर्यँत सूर गवसला नाही. या सेटमध्ये चौथ्या गेममध्ये सालसाने संस्कृतीची सर्व्हिस भेदली व हा सेट  6-1 असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. सालसा हि पीवायसी हिंदू जिमखाना येथे प्रशिक्षक हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.  दुहेरीत अंतिम फेरीच्या लढतीत सालसाने पश्चिम बंगालच्या युब्रानी बॅनर्जीच्या साथीत महाराष्ट्रच्या तेजस्वी काटे व श्रुष्टि दास यांचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करत  विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. 
 
पुरूष गटात एकेरीत कर्नाटकच्या अव्वल मानांकीत सूरज प्रबोधने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत महाराष्ट्राच्या सातव्या मानांकीत कैवल्य कलमसेचा 6-3, 6-2 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. दुहेरी गटात पश्चिम बंगालच्या इशाक इकबाल व तमिळनाडूच्या मोहित मयूर या अव्वल मानांकीत जोडीने गुजरातच्या आघरा मौलिन व धर्मिल शहा यांचा  6-1, 6-0 असा एकतर्फी पराभव करत दुहेरीचे विजेतेपद पटकावले. 
 
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली आहेत. स्पर्धेचे पारितोषिक वितरण  लगान व जोधा अकबरमधील अभिनेता अमिन हाजी यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी स्पर्धेचे संचालक जावेद सुनेसरा, स्पर्धा सुपरवायझर वैशाली शेकटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
 

स्पर्धेचा सविस्तर निकाल:मुख्य ड्रॉ(अंतिम फेरी): पुरुष गट: 

सूरज प्रबोध(कर्नाटक)(1)वि.वि. कैवल्य कलमसे(महाराष्ट्र)(7)6-3, 6-2
महिला गट: 
सालसा आहेर(महाराष्ट्र)(4)वि.वि.संस्कृती ढमेरा(तेलंगणा)(2) 6-1, 6-1
 
दुहेरी गट: अंतिम फेरी:पुरुष गट:
इशाक इकबाल(पश्चिम बंगाल)/मोहित मयूर(तमिळनाडू)(1) वि.वि.आघरा मौलिन(गुजरात)/धर्मिल शहा(गुजरात)  6-1, 6-0
महिला गट:
युब्रानी बॅनर्जी(पश्चिम बंगाल)/सालसा आहेर(महाराष्ट्र)(1) वि.वि. तेजस्वी काटे(महाराष्ट्र)/श्रुष्टि दास(महाराष्ट्र) 6-2, 6-3
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...