ब्रिटनच्या इमा राडकानू हिला विजेतेपद

Date:

पुणे: डेक्कन जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी)प्रायोजित आयटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 19व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनच्या इमा राडकानू हिने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत विजेतेपद संपादन केले.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉमध्ये अतितटीच्या झालेल्या अंतिम फेरीच्या  सामन्यात क्वालिफायर ग्रेट ब्रिटनच्या इमा राडकानू हिने पाचव्या मानांकित ग्रेट ब्रिटनच्या नैकता बेन्सचा 3-6, 6-1, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपद संपादन केले. 1तास 46 मिनिटे चाललेल्या या सामन्यात पहिल्या सेटमध्ये इमाने सुरेख सुरुवात करत दुसऱ्या गेममध्ये बेन्सची सर्व्हिस रोखली व सामन्यात 2-0अशी आघाडी घेतली. बेन्सने जोरदार खेळ करत तिसऱ्याच गेममध्ये इमाची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत सामन्यात 2-2अशी बरोबरी साधली. या सेटमध्ये बेन्सने आपले वर्चस्व कायम राखत इमाची पाचव्या, सातव्या गेममध्ये पुन्हा सर्व्हिस भेदली व हा सेट 6-3असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये इमाने आक्रमक खेळ करत पहिल्याच गेममध्ये बेन्सची सर्व्हिस रोखली. इमाने आपला रंगतदार खेळ सुरु ठेवत बेन्सला या सेटमध्ये पुनरागमन करण्याची संधीदेखील दिली नाही. इमाने तिसऱ्या, पाचव्या आणि सातव्या गेममध्ये बेन्सची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-1असा एकतर्फी जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये इमाने बेन्सची दुसऱ्या, तर बेन्सने इमाची तिसऱ्या गेममध्ये सर्व्हिस रोखली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस होल्ड करत जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. सामन्यात 5-4 अशा फरकाने आघाडीवर असताना बेन्सला आपली सर्व्हिस राखता आली नाही. इमाला विजयासाठी एका पॉईंटची आवश्यकता असताना बेन्सने मोक्याच्या क्षणी डबल फ़ॉल्ट केला व त्यामुळे इमाने बेन्सची दहाव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट 6-4असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले.

यावेळी विजेतेपदानंतर आनंद व्यक्त करताना इमा राडकानू म्हणाली की, मी तिसरा सामना सलग तीन सेटमध्ये खेळत आहे. मी सामन्यात माझ्याकडून संपूर्णपणे योगदान दिले. सामन्यात काही क्षणी मी फार चूका केल्या, पण मोक्याच्या क्षणी मिळालेल्या संधीचा फायदा घेता आला व त्यामुळेच मी विजेतेपद संपादन करू शकले. नैकता ही उत्कृष्ट टेनिसपटू असून तिने अंतिम सामन्यात सुरेख खेळ केला. तसेच, संयोजकांनी उत्तरमरित्या या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला 50 डब्लूटीए गुण व 3919डॉलर अशी पारितोषिक देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण अल्पना किर्लोस्कर, एनइसीसीचे महाव्यवस्थापक बीएसआर शास्त्री, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर आणि डेक्कन जिमखानाचे जनरल सेक्रेटरी विश्वास लोकरे, एमएसएलटीएचे आजीव उपाध्यक्ष आनंद तुळपुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक व डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे, क्लबच्या फायनान्स विभागाचे सचिव गिरीश इनामदार, आयटीएफ गोल्ड बॅच रेफ्री शितल अय्यर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ:अंतिम फेरी: एकेरी गट:
इमा राडकानू(ग्रेट ब्रिटन)वि.वि.नैकता बेन्स(ग्रेट ब्रिटन)(5)3-6, 6-1, 6-4.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

किडनी विक्री प्रकरणातील सावकरांवर कधी कारवाई करणार? – वडेट्टीवार

मुंबई- विदर्भातील शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी किडनी विकवी लागल्याचा प्रकार...

DGCA कडून विमान कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न:अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार...

घरकुल लाभार्थ्यांना तीन पावसाळे उलटले तरी घर मिळाली नाही,जनाची नाही तर मनाची ठेवा – वडेट्टीवार

मुंबई- राज्यातील घरकुल योजनेतील घरं मंजूर होऊनही गेल्या तीन...

अमेरिकेत हिमवादळामुळे 11 हजार विमानांची उड्डाणे रद्द:5 लाख घरांची वीज गेली, 153 वर्षांत पहिल्यांदाच वर्तमानपत्र छापले जाऊ शकले नाही

वॉशिंग्टन डीसी-अमेरिकेत जोरदार वाऱ्यांमुळे आणि प्रचंड बर्फवृष्टीमुळे विमानतळावरील धावपट्ट्या...