नैकता बेन्स, इमा राडकानू, ओल्गा दोरोशिना, पेंगतार्न प्लिपूच यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

Date:

पुणे, 13 डिसेंबर 2019: डेक्कन जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी)प्रायोजित आयटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 19व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनच्या नैकता बेन्स, इमा राडकानू, रशियाच्या ओल्गा दोरोशिना, थायलंडच्या पेंगतार्न प्लिपूच यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.   

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पाचव्या मानांकित ग्रेट ब्रिटनच्या नैकता बेन्स हिने थायलंडच्या पुनिन कोवा पिटुक्टेडचा 6-1, 6-1 असा एकतर्फी पराभव करून दिमाखात उपांत्य फेरी गाठली. 1तास चाललेल्या लढतीत पहिल्या सेटमध्ये नैकताने सुरेख सुरुवात करत नेट जवळून आक्रमक खेळ केला.  या सेटमध्ये पुनिनची नैकताने तिसऱ्या, पाचव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-1 असा जिंकून आघाडी मिळवली. पिछाडीवर असलेल्या पुनिनला दुसऱ्या सेटमध्येदेखील नैकताने कमबॅक करण्याची संधी दिली नाही. दुसऱ्या सेटमध्ये सुरुवातीला दोघांनी आपापल्या सर्व्हिस राखल्या.  त्यानंतर नैकताने आपली आक्रमक पवित्रा स्वीकारत चौथ्या व सहाव्या गेमला पुनिनची सर्व्हिस रोखली व 6-1 अशा सारख्याच फरकाने जिंकून विजय मिळवला. क्वालिफायर ग्रेट ब्रिटनच्या इमा राडकानू हिने आपली विजयी मालिका कायम ठेवत  बेलारूसच्या  शालिमार तालबीचा 6-1, 5-7, 6-3 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. 

थायलंडच्या आठव्या मानांकित पेंगतार्न प्लिपुच हिने ऑस्ट्रेलियाच्या ऍलिसिया स्मिथचे आव्हान 6-4, 6-3 असे मोडीत काढले. रशियाच्या ओल्गा दोरोशिना हिने   पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या जपानच्या सातो नाहो 6-3, 6-3 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. 

दुहेरीत उपांत्य फेरीतरशियाच्या  दारिया मिशीना व ऍना मोरगिना या जोडीने चौथ्या मानांकित चीनच्या जिया-की कांग व थायलंडच्या पेंगतारण प्लिपूच यांचा  6-3, 7-5 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत नॉर्वेच्या उलरीके एकेरी व रशियाच्या याशीना एकतेरिना यांनी कोरियाच्या  किम दबीन व किम ना री यांचा 6-4, 2-6, 10-3 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ:उपांत्यपूर्व फेरी: एकेरी गट:
पेंगतार्न प्लिपुच(थायलंड)(8)वि.वि.ऍलिसिया स्मिथ(ऑस्ट्रेलिया)6-4, 6-3;

इमा राडकानू(ग्रेट ब्रिटन)वि.वि.शालिमार तालबी(बेलारूस)6-1, 5-7, 6-3; 

नैकता बेन्स(ग्रेट ब्रिटन)(5)वि.वि.पुनिन कोवा पिटुक्टेड(थायलंड)6-1, 6-1;

ओल्गा दोरोशिना(रशिया)वि.वि.सातो नाहो(जपान) 6-3, 6-3; 

दुहेरी गट: उपांत्य  फेरी:

दारिया मिशीना(रशिया)/ ऍना मोरगिना(रशिया)वि.वि.जिया-की कांग(चीन)/पेंगतारण प्लिपूच(थायलंड)[4]6-3, 7-5
उलरीके एकेरी(नॉर्वे)/याशीना एकतेरिना(रशिया)(2)वि.वि. किम दबीन(कोरिया)/किम ना री(कोरिया)6-4, 2-6, 10-3. 
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यभरात हरवलेल्या ४८ हजार २७८ पैकी ३६ हजार ५८१ महिलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश

मुंबई- राज्यात गेल्या वर्षभरात तब्बल ४८ हजार २७८ अल्पवयीन...