दुसऱ्या बिलियर्ड्स व 15 रेड स्नूकर राज्य निवड अजिंक्यपद 2019 स्पर्धेत हसन बदामी, शिवम अरोरा, सुरज राठी, स्पर्श फेरवानी यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

Date:

पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आणि बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या संलग्नतेने दुसऱ्या बिलियर्ड्स व 15रेड स्नूकर राज्य निवड अजिंक्यपद 2019 स्पर्धेत स्नूकरमध्ये हसन बदामी, शिवम अरोरा, सुरज राठी, स्पर्श फेरवानी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या उप-उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित व माजी स्नूकर राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेता हसन बदामी याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत दुसऱ्या मानांकित व मुंबईच्या मानव पांचाळचा 4-0(58-39, 77-07, 52-17, 74-23) असा एकतर्फी पराभव करून आगेकूच केली. चुरशीच्या झालेल्या लढतीत गतवर्षीच्या 15रेड स्नूकर राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्या मुंबईच्या स्पर्श फेरवानीने चौथ्या मानांकित व मुंबईच्या शाहबाज खानचा 4-3(41-86, 84-12, 42-86, 42-70, 81-(76)-07, 93(75)-23, 61-10) असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. स्पर्शने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत पाचव्या व सहाव्या फ्रेममध्ये अनुक्रमे 76 व 75गुणांचा ब्रेक नोंदविला.

नुकत्याच पार पडलेल्या सिक्स रेड राज्यस्तरीय स्नूकर स्पर्धेतील विजेता पुण्याच्या शिवम अरोराने पिनाक अनपचा 4-1(71-17, 59-19, 67-27, 16-57, 76-27) असा पराभव करून आपली विजयी घौडदौड कायम ठेवली. पुण्याच्या सुरज राठीने मुंबईच्या अजिंक्य येलवेचे आव्हान 4-1(52-37, 37-50, 84-32, 58-13, 85-33) असे संपुष्टात आणले. पुण्याच्या रोहन साकळकरने कडवी झुंज देत मुंबईच्या सुमित आहुजाला 4-3(77-28, 68-40, 23-75, 27-48, 47-18, 13-69, 56-51) असे नमविले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उप-उपांत्यपूर्व फेरी:
शिवम अरोरा(पुणे)वि.वि.पिनाक अनप(पुणे) 4-1(71-17, 59-19, 67-27, 16-57, 76-27);
आनंद रघुवंशी(मुंबई)वि.वि.साहिल कराड(मुंबई) 4-1(62-22, 62-03, 64-15, 54-65, 66-21);
रोहन साकळकर(पुणे)वि.वि.सुमित आहुजा(मुंबई) 4-3(77-28, 68-40, 23-75, 27-48, 47-18, 13-69, 56-51);
सुरज राठी(पुणे)वि.वि.अजिंक्य येलवे(मुंबई) 4-1(52-37, 37-50, 84-32, 58-13, 85-33);
चिराग रामकृष्णन(मुंबई)वि.वि.विशाल वाया(मुंबई) 4-0(62-51, 60-10, 63-15, 60-05);
हसन बदामी(मुंबई)वि.वि.मानव पांचाळ(मुंबई) 4-0(58-39, 77-07, 52-17, 74-23);
स्पर्श फेरवानी(मुंबई)वि.वि.शाहबाज खान(मुंबई) 4-3(41-86, 84-12, 42-86, 42-70, 81-(76)-07, 93(75)-23, 61-10);
अभिषेक बजाज(मुंबई)वि.वि.शयान राझमी(मुंबई)4-2(73-06, 64-39, 35-68, 42-49, 71-38, 64-08).

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...