तिसऱ्या थर्डआय करंडक टी-20 क्रिकेट 2019 स्पर्धेत एमईएससीसी, एनएसएफए(नाशिक) संघांचे विजय

Date:

पुणे – थर्डआय स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स एलएलपी यांच्या तर्फे आयोजित तिसऱ्या थर्डआय करंडक टी-20 क्रिकेट 2019 स्पर्धेत साखळी फेरीत एमईएससीसी, एनएसएफए(नाशिक) या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

कटारिया हायस्कुल क्रिकेट मैदान, मुकुंदनगर येथे सुरु झालेल्या या स्पर्धेत ऑस्टिन लाझरस( 74धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर एमईएससीसी संघाने 20षटकात 5बाद 177धावा केल्या. यामध्ये ऑस्टिन लाझरस 74, सागर बिलवडे नाबाद 31, सौरभ जगदाळे 29, प्रसाद गिरकर नाबाद 15 यांनी धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. या आव्हानाचा पाठलाग करताना व्हर्च्युअल सिम्युटेकचा डाव 17.4षटकात 130धावावर संपुष्टात आला. यामध्ये जयेश राठोड 22, अच्युत मराठे 45, राहुल शिंदे 21 यांनी थोडासा प्रतिकार केला. एमईएससीसीकडून सुदेश ठाकूर 4-12, सागर बिलवडे 3-14, दीपक शिलमकर 2-39यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

दुसऱ्या सामन्यात राहुल पुरी(39धावा)याने केलेल्या खेळीच्या जोरावर एनएसएफए(नाशिक) संघाने शिवाजी इलेव्हनचा 6गडी राखून पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
एमईएससीसी: 20षटकात 5बाद 177धावा(ऑस्टिन लाझरस 74(37), सागर बिलवडे नाबाद 31(13), सौरभ जगदाळे 29, प्रसाद गिरकर नाबाद 15, अच्युत मराठे 3-20, सुजित उबाळे 1-27) वि.वि.व्हर्च्युअल सिम्युटेक: 17.4षटकात सर्वबाद 130धावा(जयेश राठोड 22, अच्युत मराठे 45, राहुल शिंदे 21, सुदेश ठाकूर 4-12, सागर बिलवडे 3-14, दीपक शिलमकर 2-39);सामनावीर-ऑस्टिन लाझरस;

शिवाजी इलेव्हन: 20षटकात सर्वबाद 97धावा(सौरभ दोडके 40(50), ऋतुराज गायकवाड 23(22), बालाजी घोडके 3-28, दर्शन सोनावणे 2-12, प्रतीक देवरे 2-10) पराभूत वि. एनएसएफए: 12.5षटकात 4बाद 98धावा(राहुल पुरी 39(28), कपिल आमटे नाबाद 19, रोहित भोरे 16, संतोष कुंजीर 2-32);सामनावीर-राहुल पुरी.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...