पुण्याच्या राजवर्धन जोशीचा मानांकित खेळाडूला पराभवाचा धक्का

Date:

  • माजी सिक्स रेड स्नूकर विजेत्या शिवम अरोराचा 97 गुणांचा हायेस्ट ब्रेक  
पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आणि बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या संलग्नतेने दुसऱ्या बिलियर्ड्स व 15रेड स्नूकर राज्य निवड अजिंक्यपद 2019 स्पर्धेत स्नुकरमध्ये फ गटात पुण्याच्या राजवर्धन जोशी याने दुसऱ्या मानांकित व माजी स्नूकर विजेत्या मानव पांचाळचा 3-2(29-63, 33-68, 61-40, 75-54, 69-65) असा संघर्षपूर्ण पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली.
 
पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत स्नूकरमध्ये राउंड रॉबिन फेरीत अ गटात मुंबईच्या आनंद रघुवंशीने हसन बदामीचा 3-1(65-17, 29-61, 64-46, 61-49) असा पराभव करून विजयी सलामी दिली. क गटात पुण्याच्या माजी सिक्स रेड स्नूकर विजेत्या शिवम अरोरा याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करताना मुंबईच्या विशाल वायाचा 3-0(68-48, 99(97)-18, 67-10) असा एकतर्फी पराभव केला. शिवम याने सुरेख खेळ करत दुसऱ्या फ्रेममध्ये 97 गुणांचा स्पर्धेतील आतापर्यंतचा हायेस्ट ब्रेकची नोंद केली. 
 
ब गटात पुण्याच्या  सुरज राठी याने पहिल्या सामन्यात मुंबईच्या रयान राझमीचा 3-0(92(62)-09, 59-47, 63-30) असा तर, दुसऱ्या सामन्यात पुण्याच्या योगेश शर्माचा 3-1(27-60, 70-00, 72-66, 55-17) असा पराभव करून पुढील फेरीतील आपले स्थान निश्चित केले. पुण्याच्या साद सय्यदने मुंबईच्या निखिल सैगलवर 3-1(61-49, 43-56, 92(54)-06, 49-09) असा विजय मिळवला. सादने आपल्या खेळीत तिसऱ्या फ्रेममध्ये 54गुणांचा ब्रेक नोंदविला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: राउंड रॉबिन:
गट अ: आनंद रघुवंशी(मुंबई)वि.वि.हसन बदामी(मुंबई) 3-1(65-17, 29-61, 64-46, 61-49);
गट अ: साद सय्यद(पुणे)वि.वि.निखिल सैगल(मुंबई) 3-1(61-49, 43-56, 92(54)-06, 49-09);
गट अ: हसन बदामी(मुंबई)वि.वि.निखिल सैगल(मुंबई)3-1(50-67, 54-45, 53-40, 57-17);
गट अ: आनंद रघुवंशी(मुंबई)वि.वि.साद सय्यद(पुणे)3-1(72-28, 65-54, 64-72, 59-05);
गट ब: रयान राझमी(मुंबई)वि.वि.स्पर्श फेरवानी(मुंबई)3-0(63-29, 73-30, 90-65);
गट ब: सुरज राठी(पुणे)वि.वि.रयान राझमी(मुंबई)3-0(92(62)-09, 59-47, 63-30);
गट ब: सुरज राठी(पुणे)वि.वि.योगेश शर्मा(पुणे)3-1(27-60, 70-00, 72-66, 55-17);
गट ब: स्पर्श फेरवानी(मुंबई)वि.वि.योगेश शर्मा(पुणे)3-0(58-12, 71-09, 65-11);
गट क: शिवम अरोरा(पुणे)वि.वि.विशाल वाया(मुंबई)3-0(68-48, 99(97)-18, 67-10);
गट क: विशाल वाया(मुंबई)वि.वि.प्रतीक चव्हाण(पुणे) 3-0(89-20, 62-25, 88-08);
गट क: शिवम अरोरा(पुणे)वि.वि.निशाद चौघुले(पुणे) 3-0(54-43, 93(41)-24, 68-34);
गट ड: रोहन साकळकर(पुणे)वि.वि.चिराग रामकृष्णन(मुंबई) 3-1(63-33, 63-50, 39-74, 65-26);
गट ड: पोरस शहा(मुंबई)वि.वि.अनंत मेहता(मुंबई)3-2(09-60, 65-14, 61-46, 42-69, 57-40);
गट ई: शाहबाज खान(मुंबई)वि.वि.ओमर फारुकी(औरंगाबाद)3-0(69-24, 59-19, 74-29);
गट ई: शयान राझमी(मुंबई)वि.वि.विशाल गेहानी(मुंबई)3-1(60-28, 43-72, 54-17, 59-20);
गट फ: राजवर्धन जोशी(पुणे)वि.वि.मानव पांचाळ(मुंबई)3-2(29-63, 33-68, 61-40, 75-54, 69-65);
गट ह: अभिषेक बजाज(मुंबई)वि.वि.सिद्धेश मुळ्ये(चिपळूण) 3-0(73-01, 57-40, 65-33). 
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

येरवडा कारागृहात 5 मोबाईल,2 पॉवर बँक,चार्जिंग वायर सापडली..

पुणे- येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न...

माझी गाणी आजही रसिकांच्या पसंतीत -सिनेगीतकार समीर अंजान

'एमआयटी एडीटी' विद्यापीठाच्या 'पर्सोना महोत्सवा'ची उत्साहात सांगता लोणी-काळभोर (पुणे)...

अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धेत सलग दहा वर्षे विजेतेपदाची परंपरा कायम!

पिंपरी चिंचवड महापालिकेचा दणदणीत विजयपिंपरी : पुणे आंतर कचेरी...