पहिल्या डावात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या 150 धावा

Date:

पुणे, दि. 22 नोव्हेंबर 2019- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू  भालेकर करंडक निमंत्रित १९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत पहिल्या दिवशी यतीन एम(10-48-3), प्रसन्ना हजारे(14-47-3) यांनी भेदक गोलंदाजीच्या जोरावर केडन्स संघाने व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीला 150 धावांवर रोखून आपले वर्चस्व राखले.

पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या अंतिम सामन्याच्या दोन दिवसीय लढतीत पहिल्या दिवशी व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केडन्सच्या यतीन एम(48-3), प्रसन्ना हजारे(47-3), शुभम खरात (23-2), गौरव कुमकर(21-2)यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीपुढे व्हेरॉक संघाचा डाव 44.3षटकात 158धावांवर संपुष्टात आला. यात अद्वैत मुळ्येने एकाबाजूने लढताना 75 चेंडूत 5चौकार व 4षटकारांच्या मदतीने 49 धावांची संयमपूर्ण खेळी केली. अद्वैत मुळ्ये यतीनच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक कपिल देडगेकडे झेल बाद झाल्यानंतर श्रेयश केळकर 30, यश जगदाळे 23, यज्ञेश मोरे 16, हर्षवर्धन पवार नाबाद 12 यांनी धावा काढून थोडासा प्रतिकार केला. 

याच्या उत्तरात केडन्स संघाने पहिल्या डावात आजदिवस अखेर 46षटकात 4बाद 109धावा केल्या. यात तेजस बांदल(14धावा)व प्रद्युम्न चव्हाणने 52चेंडूत 25धावा या सलामीच्या जोडीने 87चेंडूत 41 धावा करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. हे दोघेही बाद झाल्यानंतर गौरव कुमकरने 64 चेंडूत 3चौकारांच्या मदतीने 27धावा व ऋषी राऊत(नाबाद 25धावा) यांनी चौथ्या गडयासाठी 101 चेंडूत 32धावांची भागीदारी केली. अजून शुभम खरात नाबाद 4धावा व ऋषी राऊत नाबाद 25धावांवर खेळत आहे. व्हेरॉक व केडन्स यांच्यातील लढतीचा अजून एक दिवसाचा खेळ बाकी आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
पहिला डाव:
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 44.3षटकात सर्वबाद 158धावा(अद्वैत मुळ्ये 49(75,5×4,4×6), श्रेयश केळकर 30(31,6×4), यश जगदाळे 23, यज्ञेश मोरे 16, हर्षवर्धन पवार नाबाद 12, यतीन एम 10-48-3, प्रसन्ना हजारे 14-47-3, शुभम खरात 3.3-23-2, गौरव कुमकर 5-21-2)वि.केडन्स: 46षटकात 4बाद 109धावा(तेजस बांदल 14, गौरव कुमकर 27(64,3×4), प्रद्युम्न चव्हाण 25(52,5×4), ऋषी राऊत नाबाद 25(67,4×4), शुभम खरात नाबाद 4, रोहित चौधरी 17-50-2, सोहम जामले 16-15-2)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मी खोटं एफआयआर केल्याचे सिद्ध झाले तर मला जेल मध्ये टाका.. रोहित पवार आक्रमक

VSR आणि विमान वाहतूक मंत्र्याचे लागेबांधे बारामती - मी...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार:रोहित पवार आक्रमक; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित-युगेंद्र पवार मैदानात:बारामती पोलिस ठाण्यात दाखल; समर्थकांची गर्दी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

दिल्ली पोलिसांवर हिमाचलमध्ये गुन्हा दाखल,हिमाचल पोलीस म्हणाले,इकडे मनमानी नाही चालणार,नाकेबंदी करून थांबवले

शिमला-हिमाचल प्रदेशमध्ये दिल्ली पोलिसांवर बुधवारी एफआयआर (FIR) दाखल करण्यात...