पुणे-राजेश वाधवान समूह यांच्या मालकीच्या इंडियन सुपर लीगमधील टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघाने गुरुवारी पार पडलेल्या शानदार पत्रकार परिषदेत बॉलिवूडचा युवा स्टार अभिनेता अर्जुन कपूर याची क्लबचा नवा सहमालक म्ह्णून घोषणा केली.
देशातील युवक वर्गाचा आवडता अभिनेता असलेल्या अर्जुन कपूरला एफसी पुणे सिटी संघात सामील करताना संघमालक कार्तिक वाधवान भलतेच उत्साहित झाले होते. एफसी पुणे सिटी संघाच्या परिवारात अर्जुनचे हार्दिक स्वागत करताना मला अतिशय आनंद आणि अभिमान वाटत आहे असे सांगताना ते म्हणाले कि,अर्जुनच्या रूपाने मला केवळ एक सहमालक मिळाला नसून एक अस्सल फुटबॉल प्रेमी आणि क्लबचा नवा पाठीराखा मिळाला आहे. त्याचे फुटबॉलविषयीचे ज्ञान, फुटबॉलवरील निष्ठा आणि त्याची बॉलिवूड स्टार असल्यामुळे त्याच्या भोवती असणारे वलय त्यामुळे एफसी पुणे सिटी संघासाठी तो अतिशय योग्य असा रोल मॉडेल आहे.
आपल्या नव्या सहमालकाची ओळख एफसी पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल म्हणाले कि, एफसी पुणे सिटी संघाचा सहमालक म्हणून आम्ही अर्जुन कपूरचे स्वागत करतो. अर्जुन हा केवळ एक युथ आयकॉन नसून तो एक जातिवंत फुटबॉल प्रेमी आहे. एफसी पुणे सिटीशी त्याचे नाते जुळल्यामुळे आमच्या प्रेक्षक संख्येत प्रचंड वाढ होईल. तसेच राज्यभर व देशभर क्लबची लोकप्रियताही वाढेल.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अर्जुन कपूर म्हणाला कि माझे फुटबॉलवर अतिशय प्रेम आहे आणि मी फुटबॉल पाहताच लहानाचा मोठा झालो. आयएसइच्या अन्य संघांचे अनेक सहमालक आहेत आणि त्यांच्याशी अजूनही मी नियहमीतपणे फुटबल खेकलो. फुटबॉलच्या क्षेत्रात एफसी पुणे सिटीचे कार्य केवळ अजोड असेच आहे आणि त्यामुळे मी या जोडला जाणे नायनाट स्वाभाविक होते. संपूर्ण राज्य भरात फुटबॉलचे व्यावसायिक जाळे निर्माण करण्याच्या क्लबच्या कार्यात मीही आता आहे. आमच्या सहयोगामुळे आणि एकत्रित योगदानामुळे एक महत्वाकांक्षी आणि दर्जेदार फुटबॉल संघ उभा आसा मला विश्वास वाटतो. आयएस पहिला फुटबॉल संघ असलेला एफसी पुणे कब हा सर्व सुविधांनी युक्त निवसई प्रशिक्षण अकादमी असलेला एकमेव संघ आहे तसेच, १४१६ व १८ वर्षाखाली असे तीन जुनिअर संघ आणि महिलांचा संघ असा सर्वागीण विस्तार असणारा असा तो एकमेव संघ आहे.