दुसऱ्या बिलियर्ड्स व 15 रेड स्नूकर राज्य निवड अजिंक्यपद 2019 स्पर्धेत अरुण अग्रवाल, राजीव शर्मा, मनन शहा, शिवम अरोरा, रयान राझमी, अमित सप्रू यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

Date:

पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आणि बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या संलग्नतेने दुसऱ्या बिलियर्ड्स व 15रेड स्नूकर राज्य निवड अजिंक्यपद 2019 स्पर्धेत बिलियर्ड्समध्ये मुंबईच्या अरुण अग्रवाल, रयान राझमी, राजीव शर्मा, अमित सप्रू, मनन शहा, पुण्याच्या शिवम अरोरा यांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत बिलियर्ड्समध्ये अखेरच्या राउंड रॉबिन फेरीत ड गटात मुंबईच्या मनन शहाने पुण्याच्या राजवर्धन जोशीचा 3-2(100-45, 70-100, 46-100, 100-24, 100-40) असा संघर्षपूर्ण पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात मननने पुण्याच्या निशाद चौघुलेचा 3-2(0-1FA, 100-77, 89-100, 100-83, 100-85) असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. ब गटात 21वर्षाखालील गटातील राज्यातील अव्वल स्नूकर खेळाडू रयान राझमीने आपली विजयी मालिका कायम ठेवत शुभम रांधेचा 3-0(100-54, 100-31, 100-56) असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. क गटात पुण्याच्या शिवम अरोराने मुंबईच्या शयान राझमीचा 3-0(100-57, 100-76, 100-68) असा पराभव करून आपले आव्हान कायम राखले.

स्नूकरमध्ये अमर रायकर, सतीश कराड, संतोष धर्माधिकारी, माधव जोशी या पुण्याच्या खेळाडूंनी पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: बिलियर्ड्स: राउंड रॉबिन फेरी:
गट अ: अरुण अग्रवाल(मुंबई)वि.वि.तहा खान(मुंबई) 3-1(100-54, 56-100, 100-23, 100-62);

गट ब: रयान राझमी(मुंबई)वि.वि.शुभम रांधे(मुंबई) 3-0(100-54, 100-31, 100-56);
गट ब: यश रुंगता(मुंबई)वि.वि.शुभम रांधे(मुंबई) 3-1(66-100, 100-53, 100-54, 100-62);
गट ब: यश रुंगता(मुंबई)वि.वि.ललित झाम(मुंबई) 3-1(66-100, 100-53, 100-54, 100-62);

गट क: राजीव शर्मा(मुंबई)वि.वि.आनंद रघुवंशी(पुणे) 3-0(100-68, 100-88, 100-51);
गट क: शिवम अरोरा(पुणे)वि.वि.शयान राझमी(मुंबई) 3-0(100-57, 100-76, 100-68);
गट क: राजीव शर्मा(मुंबई)वि.वि.शिवम अरोरा(पुणे) 3-1(100(72)-30, 100(69)-88, 87-100, 100-82);
गट क: शयान राझमी(मुंबई)वि.वि.आनंद रघुवंशी(पुणे) 3-1(100-51, 100-37, 63-100, 100-56);

गट ड: मनन शहा(मुंबई)वि.वि.राजवर्धन जोशी(पुणे) 3-2(100-45, 70-100, 46-100, 100-24, 100-40);
गट ड: अमित सप्रू(मुंबई)वि.वि.निशाद चौघुले(पुणे) 3-1(48-100, 100-62, 100-98, 100-44);
गट ड: मनन शहा(मुंबई)वि.वि.निशाद चौघुले(पुणे) 3-2(0-1FA, 100-77, 89-100, 100-83, 100-85);
गट ड: अमित सप्रू(मुंबई)वि.वि.मनन शहा(मुंबई) 3-1(100-91, 100-49, 69-100, 100-75);
गट ड: निशाद चौघुले(पुणे)वि.वि.राजवर्धन जोशी(पुणे) 3-2(74-100, 101-52, 101-90, 68-101, 100(53)-38).

स्नूकर: पहिली पात्रता फेरी:
अमर रायकर(पुणे)वि.वि.सलील देशपांडे(पुणे) 3-0(72-44, 57-45, 50-49);
सतीश कराड(पुणे)वि.वि.गौरव देशमुख(पुणे) 3-1(46-37, 61-19, 17-45, 47-33);
संतोष धर्माधिकारी(पुणे)वि.वि.अरुण बर्वे(पुणे) 3-1(49-37, 55-62, 72-33, 62-37);
माधव जोशी(पुणे)वि.वि.सिद्धार्थ टेंबे(पुणे) 3-0(70-33, 66-03, 70-14).

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...