दुसऱ्या बिलियर्ड्स व 15 रेड स्नूकर राज्य निवड अजिंक्यपद 2019 स्पर्धेत अरुण अग्रवाल, राजीव शर्मा, शिवम अरोरा, रयान राझमी यांचे विजय

Date:

स्पर्धेतील आतापर्यंतचा अरुण अग्रवालचा 80 गुणांचा हायेस्ट ब्रेक

पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आणि बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या संलग्नतेने दुसऱ्या बिलियर्ड्स व 15रेड स्नूकर राज्य निवड अजिंक्यपद 2019 स्पर्धेत बिलियर्ड्समध्ये मुंबईच्या अरुण अग्रवाल, रयान राझमी, राजीव शर्मा यांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून विजय मिळवला.

पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत बिलियर्ड्समध्ये राउंड रॉबिन फेरीत अ गटात मुंबईच्या व माजी राज्य बिलियर्ड्स विजेता अरुण अग्रवालने आपला शहर सहकारी चंदू कंसोडरियाचा 3-1(44-101, 100-49, 101-57, 100(80)-05) असा पराभव करून शानदार सुरुवात केली. अरुण याने आपल्या खेळीत चौथ्या फ्रेममध्ये 80 गुणांचा ब्रेक नोंदवून आतापर्यंतच्या हायेस्ट ब्रेकची नोंद केली. तर दुसऱ्या सामन्यात अरुण याने संजीव बिजलानीचा 3-0(100-60, 100-11, 100-18) असा सहज पराभव केला. ब गटात मुंबईच्या रयान राझमीने यश रुंगताचा 3-1(78-100, 100-55, 100-33, 100-56) असा पराभव करून विजयी सलामी दिली.क गटात चुरशीच्या लढतीत पुण्याच्या शिवम अरोराने आनंद रघुवंशीचा 3-2(42-100, 96-100, 100-760, 100-91, 100-48) असा संघर्षपूर्ण पराभव केला.

आजपासून सुरु झालेल्या स्नूकरमध्ये पात्रता फेरीच्या चरणात पुण्याच्या निशाद चौघुलेने सत्चित जामगावकरचा  3-0(64-02, 57-02, 65-33) असा तर, मुंबईच्या शुभोजित रॉयने पुण्याच्या स्वप्निल बिचेचा 3-2(47-33, 42-68, 51-40, 06-46, 64-59) असा पराभव करून आगेकूच केली.

याआधी स्नूकरचे उदघाटन डेक्कन जिमखानाचे जनरल सेक्रेटरी विश्वास लोकरे, पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ सुधीर भाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाचे उदय पुंडे,  वरिष्ठ स्नूकर खेळाडू उषा खंडेलवाल,  डेक्कन जिमखानाचे बिलियर्ड्स विभागाचे सचिव विजय कदम, टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे, संजीव ताटके आणि सलील देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: राउंड रॉबिन: बिलियर्ड्स:
गट अ: अरुण अग्रवाल(मुंबई) वि.वि.संजीव बिजलानी(मुंबई) 3-0(100-60, 100-11, 100-18);
गट अ: चंदू कंसोदारिया(मुंबई) वि.वि.तहा खान(पुणे) 3-1(100-47, 100-52, 35-100, 102-66);
गट ब: रयान राझमी(मुंबई)वि.वि.यश रुंगता(मुंबई) 3-1(78-100, 100-55, 100-33, 100-56);
गट अ: अरुण अग्रवाल(मुंबई)वि.वि. चंदू कंसोडरिया(मुंबई) 3-1(44-101, 100-49, 101-57, 100(80)-05);
गट अ: तहा खान(पुणे)वि.वि.संजीव बिजलानी(मुंबई) 3-0(100-61, 100-27, 100-99);
गट ब: रयान राझमी(मुंबई)वि.वि.यश रुंगता(मुंबई) 3-1(78-100, 100-55, 100-33, 100-56);
गट ब: शुभम रांधे(मुंबई)वि.वि.ललित झाम(मुंबई) 3-0(100-63, 100-82, 100-95);
गट क: राजीव शर्मा(मुंबई)वि.वि.शयान राझमी(मुंबई) 3-1(100-95, 50-100, 100-61, 100-64);
गट क: शिवम अरोरा(पुणे)वि.वि.आनंद रघुवंशी(पुणे) 3-2(42-100, 96-100, 100-760, 100-91, 100-48);
गट क: रयान राझमी(मुंबई)वि.वि.ललित झाम(मुंबई) 3-0(100-31, 100-59, 100-30);
गट ड: अमित सप्रू(मुंबई)वि.वि.राजवर्धन जोशी(पुणे) 3-1(101-97, 82-100, 100-77, 101-79);

स्नूकर: पहिली पात्रता फेरी:
निशाद चौघुले(पुणे)वि.वि.सत्चित जामगावकर(पुणे) 3-0(64-02, 57-02, 65-33);
शुभोजित रॉय(मुंबई)वि.वि.स्वप्निल बिचे(पुणे) 3-2(47-33, 42-68, 51-40, 06-46, 64-59);
सुमित साळदुरकर(पुणे)वि.वि.अभिषेक बोरा(पुणे) 3-0(56-24, 68-52, 78-01).

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘रिझर्व्ह बँक’ व ‘सेबी’ फक्त “दुर्वा” उपटतात काय ?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ( आरबीआय) सर्व बँकांची नियामक...

गरीबाच्या मुखी दुध जाहले महाग …आता गाईचे दूध 58 रुपये तर म्हशीचे दूध 74 रुपये लिटर

पुणे - भेसळीच्या पनीर ने राज्यात उच्छाद मांडला असताना...

संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये बेवड्यांनी लावली आग:अर्धा हेक्टर जंगल जळून खाक

मुंबई-मुंबईच्या बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये बेवड्यांनी आग...

महाबळेश्वर पर्यटन: कार पसरणी घाटात १०० मीटर दरीत कोसळून भीषण अपघात

पुणे- लोणी काळभोर येथील तरुण महाबळेश्वर या ठिकाणी फिरण्यासाठी...