पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित सातव्या पीवायसी-पुसाळकर सु-रक-क्षा कंपोनंट्स पीवायसी प्रीमियर लीग क्रिकेट 2019 स्पर्धेत अंतिम फेरीत आश्विन शहा(नाबाद 29धावा व 1-4) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर गतविजेत्या डॉल्फिन्स संघाने स्कायलार्कस संघाचा 6 गडी राखून पराभव करत सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद संपादन केले.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीच्या सामन्यात पहिल्यांदा खेळताना डॉल्फिन्स संघाच्या अचूक गोलंदाजीपुढे स्कायलार्कस संघाने 6षटकात 4बाद 42धावा केल्या. यात आशिष राठी 17, गौरव सावगावकर 14 यांनी धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. , डॉल्फिन्सकडून आश्विन शहाने 4धावात 1 गडी बाद केला.
डॉल्फिन्स संघाने हे आव्हान केवळ 3.5षटकात 2बाद 43धावा करून पूर्ण केले. यामध्ये आश्विन शहाने 13चेंडूत 3चौकार व 2षटकारांच्या मदतीने नाबाद 29 धावा करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. आश्विनला रोहन छाजेडने 7धावा करून सुरेख साथ दिली. स्कायलार्कसकडून प्रशांत सुतार(1-8), अंकुश जाधव(1-5) यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. अष्टपैलू कामगिरी करणारा आश्विन शहा हा सामन्याचा मानकरी ठरला.
स्पर्धेतील विजेत्या डॉल्फिन्स संघाला ज्ञानेश्वर आगाशे मेमोरियल करंडक अशी पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुसाळकर सु-रक-क्षाचे रोहन पुसाळकर, इंडोशॉटलेचे व्यवस्थापकीय संचालक रामचंद्र राव, पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ सुधीर भाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबचे मानद सचिव आनंद परांजपे आणि क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, बृहन्स ग्रीन लिफचे आशुतोष आगाशे, वूमेन्स क्रिक झोनचे अभिजित खानविलकर, कूपर कॉर्पचे विक्रम ओगळे, कारा इंटलेक्टचे रणजीत पांडे, अभिषेक ताम्हाणे, सारंग लागू, तुषार नगरकर, देवेंद्र चितळे आणि कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
स्कायलार्कस: 6षटकात 4बाद 42धावा(आशिष राठी 17(14,1×4,1×6), गौरव सावगावकर 14(11), आश्विन शहा 1-4)पराभूत वि.डॉल्फिन्स: 3.5षटकात 2बाद 43धावा(आश्विन शहा नाबाद 29(13,3×4,2×6), रोहन छाजेड 7, प्रशांत सुतार 1-8, अंकुश जाधव 1-5);सामनावीर-आश्विन शहा.
इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट फलंदाज: अंकुश जाधव(129धावा);
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: रिषभ गादिया(5विकेट);
मालिकावीर: श्रीनिवास चाफळकर(211धावा, 4विकेट व 6कॅचेस);
मोस्ट डिसिप्लीन टीम:बुल्स;
मोस्ट स्पोर्टिंग टीम: लायन्स ;
मोस्ट व्हॅल्युएबल वरिष्ठ खेळाडू: प्रशांत सुतार;
मोस्ट व्हॅल्युएबल कुमार खेळाडू: असिम देवगावकर;
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक: अनुज मेहता(4कॅचेस);
उत्कृष्ट यष्टीरक्षक: अक्षय ओक(4कॅचेस व 4स्टम्पिंग) .
मोस्ट कॅचेस: श्रीनिवास चाफळकर;
मोस्ट विकेट ईन मॅच: सोहन अनगळ;
युवा खेळाडू: रणित जैन.