पुणे: द पूना क्लब लिमिटेड आणि बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या संलग्नतेने बीएसएएम सिक्स रेड स्नूकर राज्य निवड अजिंक्यपद 2019 स्पर्धेत माजी सिक्स रेड स्नूकर विजेता शिवम अरोरा याने मुंबईच्या मानव पांचाळचा 7-4(35-33, 51-11, 65-00, 39-17, 22-33, 22-38, 48-18, 28-42, 23-30, 36-10, 41-04) असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
पूना क्लब येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत उत्कंठावर्धक झालेल्या सामन्यात पुण्याच्या शिवम अरोरा याने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत दुसऱ्या मानांकित मुंबईच्या मानव पांचाळ याचा 7-4(35-33, 51-11, 65-00, 39-17, 22-33, 22-38, 48-18, 28-42, 23-30, 36-10, 41-04) असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. 2तास 40मिनिटे चाललेल्या सामन्यात शिवम याने सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व कायम राखले. सामन्यात 4-0अशा फरकाने आघाडीवर असताना मानवने सुरेख खेळ करत पिछाडी भरून काढली व त्यामुळे सामन्यात 5-4अशी स्थिती झाली. पण त्यानंतर मानव याने केलेल्या चुकांचा फायदा घेत शिवमने पुढील दोन्ही फ्रेम जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
यावेळी शिवम म्हणाला कि, मानव हा उत्तम पॉटर आहे. सामन्यात सुरुवातीला मी 4-0अशा फरकाने आघाडीवर होतो. पण पिछडीवरून जोरदार कमबॅक करत सामन्यात 5-4अशी स्थिती निर्माण केली. पण पुढील दोन्ही फ्रेममध्ये मला वर्चस्व राखता आले. हा विजय माझ्यासाठी खूप महत्वाचा असून माझ्या कारकिर्दीतील हे पहिले राज्यस्तरीय स्पार्धेतील विजेतेपद आहे.
याआधीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत चुरशीच्या झालेल्या सामन्यात दुसऱ्या मानांकित मुंबईच्या मानव पांचाळने आपला सहकारी शाहबाज खानचा 6-5(22-34, 31-37, 47-10, 35-12, 12-51, 50-16, 35-17, 29-32, 57(52)-01, 33-39, 34-31) असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. 2तास चाललेल्या या सामन्यात निर्णायक फ्रेममध्ये शाहबाज खान हा 31-00अशा फरकाने आघाडीवर होता. पण विजयाच्या जवळ असताना शाहबाजकडून फ्लक झाला व याचाच फायदा घेत मिळालेल्या संधीचे सोने करत मानव याने ही फ्रेम 34-31 अशी जिंकून विजय मिळवला.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत पुण्याच्या शिवम अरोराने मुंबईच्या अव्वल मानांकित हसन बदामीचास 6-1(48-25, 35-26, 42-17, 55-00, 36-12, 13-44, 30-19) असा सनसनाटी पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
हसन बदामी(मुंबई), मानव पांचाळ(मुंबई), अभिषेक बोरा(पुणे), शिवम अरोरा(पुणे), माधव जोशी(पुणे), तहा खान(पुणे), शाहबाज खान(मुंबई), संकेत मुथा)मुंबई)या खेळाडूंची आगामी 2020 मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेसाठी झाली असून आणखी दोन महाराष्ट्राच्या खेळाडूंना बीएसएएम तर्फे वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात येणार असल्याचे बीएसएएमचय अध्यक्ष राजन खिंवसरा यांनी सांगितले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:
शिवम अरोरा(पुणे)वि.वि.हसन बदामी(मुंबई)(1) 6-1(48-25, 35-26, 42-17, 55-00, 36-12, 13-44, 30-19);
मानव पांचाळ(मुंबई)(2)वि.वि.शाहबाज खान(मुंबई) 6-5(22-34, 31-37, 47-10, 35-12, 12-51, 50-16, 35-17, 29-32, 57(52)-01, 33-39, 34-31);
अंतिम फेरी: शिवम अरोरा(पुणे)वि.वि.मानव पांचाळ(मुंबई)(2) 7-4(35-33, 51-11, 65-00, 39-17, 22-33, 22-38, 48-18, 28-42, 23-30, 36-10, 41-04).