औरंगाबाद: एड्युरन्स् मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर(इएमएमटीसी)यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए – योनेक्स् सनराईज् 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या सिद्धार्थ मराठे, जैष्णव शिंदे व मुलींच्या गटात रुमा गायकैवारी यांनी मानांकीत खेळाडूंवर विजय मुळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
इएमएमटीसी टेनिस कोर्ट,डिव्हिजनल स्पोर्टस् कॉम्पलेक्स् येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या बिगर मानांकीत सिद्धार्थ मराठेने कर्नाटकच्या दुस-या मानांकीत प्रणव रेथीनचा 7-5, 6-2 असा तर जैष्णव शिंदेने कर्नाटकच्या दुस-या मानांकीत ऋषील खोसलाचा 6-2, 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दिल्लीच्या अधिरी अवलने महाराष्ट्राच्या सहाव्या मानांकीत काहिर वारीकचा 6-1, 6-3 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
मुलींच्या गटात उपांत्यपुर्व महाराष्ट्राच्या सहाव्या मानांकीत रुमा गायकैवारीने हरियाणाच्या दुस-या मानांकीत नंदिनी दिक्षितचा 6-4, 6-2 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्राच्या नवव्या मानांकीत परी चव्हाणने पंजाबच्या साहिरा सिंगचा 6-1, 6-4 असा तर महाराष्ट्रच्या सायना देशपांडेने महाराष्ट्राच्याच मधुरीमा सावंतचा 6-4, 3-6, 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुले: उपांत्यपुर्व फेरी:
सिद्धार्थ मराठे(महाराष्ट्र)वि.वि. प्रणव रेथीन(3)(कर्नाटक) 7-5, 6-2
जैष्णव शिंदे(महाराष्ट्र) वि.वि. ऋषील खोसला(2)(कर्नाटक) 6-2, 6-4
अधिरी अवल(दिल्ली) वि.वि काहिर वारीक(महाराष्ट्र)(6) 6-1, 6-3
विनिथ मुत्याला(महाराष्ट्र) वि.वि वैभव श्रीराम (महाराष्ट्र) 6-4, 6-4
मुली: उपांत्यपुर्व फेरी:
रुमा गायकैवारी(6)(महाराष्ट्र) वि.वि नंदिनी दिक्षित(2)(हरियाणा) 6-4, 6-2
परी चव्हाण(9)(महाराष्ट्र) वि.वि साहिरा सिंग(पंजाब) 6-1, 6-4
कुंदना भंडारू(4)(तमिळनाडू) वि.वि अमोदीनी नाईक(12)(कर्नाटक) 6-1, 6-1
सायना देशपांडे(महाराष्ट्र) वि.वि मधुरीमा सावंत(महाराष्ट्र) 6-4, 3-6, 6-4