पुणे- आयडीयाज् अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 16व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2019- 20 स्पर्धेत पुणे व परिसरातील एकुण 32 आयटी कंपन्यांच्या संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धात 9 नोव्हेंबर 2019 पासून व्हेरॉक क्रिकेट मैदान, पुना क्लब क्रिकेट मैदान, पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदान येथे सुरू होणार आहे.
स्पर्धेत टीसीएस, केपीआयटी, टीएटो, आयडीयाज्,फिनआयक्यू, कॅपजेमिनी, विप्रो, टिबको, इन्फोसीस, कॉग्निझंट, ग्लोबाकॉम, एलटीआय, सिमेंस, टेक महिंद्रा, झेंन्सर, हर्मन, मर्क्स, अॅटॉस्, बार्कलेज, क्रेडीट सुईस, अँमडॉक्स, गालघर, सुनर्झीप, पबमॅटीक, आयबीएम, सनगार्ड एएस, प्रिंगर नेचर, दसॉल्ट सिस्टिम्स, सायबेज, यार्डी, सिनेक्रॉन आणि एफआयएस ग्लोबल या 32 संघ सहभागी झाले आहेत.
स्पर्धेचे सामने साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. 32 संघांची 8 गटांमध्ये प्रत्येकी 4 संघ अशी विभागणी करण्यात आली आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघ 3 सामने खेळणार आहेत.
स्पर्धेत एकूण 1 लाख 20 हजार रूपयंची पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व 60हजार रुपये, तर उपविजेत्या संघाला करंडक व 40हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. मालिकावीर खेळाडूला करंडक व 10 हाजर रूपये, सर्वोत्तम फलंदाज व गोलंदाजाला प्रत्येकी 5 हजारूपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.