पुणे- पुणे जिल्हा फुटबॉल संघटना(पीडीएफए)यांच्या तर्फे आयोजित पुणे फुटबॉल लीग(2017-18) स्पर्धेत तृतीय श्रेणी गटात फिनआयक्यू जीओजी, व्होबा या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.
पीडीएफएच्या ढोबरवाडी येथील मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत तृतीय श्रेणी गटात पहिल्या सामन्यात फिनिक्यू जीओजी एफसी संघाने टेलीकॉम स्पोर्ट्स क्लबचा ९-० असा धुव्वा उडविला. विजयी संघाकडून प्रकाश थोरात(७,२९,३६मि.), भुवनेश पिल्ले(३२, ४०, ४३मि.)यांनी प्रत्येकी तीन गोल, श्रीकांत मलंगिरीने दोन, कार्तिक राजूने एक गोल केला.
व्होबा संघाने नॅशनल युथ फुटबॉल अकादमीचा ३-२ असा संघर्षपूर्ण पराभव केला. जायंट्स ब व थंडरकॅट्ज ब यांच्यातील सामना २-२ असा बरोबरीत सुटला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: गटसाखळी फेरी: तृतीय श्रेणी गट:
फिनिक्यू जीओजी एफसी: ९(प्रकाश थोरात ७मि.पास-कार्तिक राजू, श्रीकांत मलंगिरी ८मि.,प्रकाश थोरात २९मि.पास-अर्शद मुल्ला, भुवनेश पिल्ले ३२मि.,प्रकाश थोरात ३६मि.पास-श्रीकांत मलंगिरी, भुवनेश पिल्ले ३८मि., श्रीकांत मलंगिरी ४०मि.पास-कार्तिक राजू, कार्तिक राजू ४२मि.पास-भुवनेश पिल्ले, भुवनेश पिल्ले ४३मि.)वि.वि.टेलीकॉम स्पोर्ट्स क्लब: ०;
व्होबा: ३(रेयान जे १३मि.पास-ऍरोन डिसिल्वा, रेयान जे ३४मि.(सोलो), जितेंद्र ललवानी ४०मि.पास-डॅनियल डिसूजा)वि.वि.नॅशनल युथ फुटबॉल अकादमी: २(अजिंक्य शिंदे ३५मि., अमित निलपाणी ३७मि.पास-कपिल गौरव);
जायंट्स ब: २(निलेश वर्मा २१मि.पास-शगुन पाटील,वर्जिवन दस्तूर २९मि.)वि.वि.थंडरकॅट्ज ब: २(रोहन ३२मि., रुपेश के. ३७मि.);
लिजेंड्स युनायटेड एफसी: ० बरोबरी वि.एएफए सॅमफोर्ड: ०.