पुणे: सोलारिस क्लब व पीएमडीटीएच्या संलग्नतेने आयोजित व रावेतकर हाऊसिंग यांच्या तर्फे प्रायोजित सोलारिस आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत आरपीटीए सोलारिस, डायमंड्स, एसपी सुलतान्स, महाराष्ट्र मंडळ या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
मयूर कॉलनी येथील सोलारिस क्लब टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत आरपीटीए सोलारिस संघाने ओडीएमटी ब संघाचा 24-04 असा सहज पराभव करून विजयी सुरुवात केली. आरपीटीए सोलारिस संघाकडून संजीव घोलप,रवी कात्रे, जयंत पवार,हेमंत भोसले, रवी पांडे,फैजल अन्सारी, सिद्धू बी,अन्वित फाटक यांनी सुरेख कामगिरी बजावली. दुसऱ्या सामन्यात संतोष शहा, आशिष डिके, स्वेतल शहा, हरकिरत सिंग, मंदार मेहेंदळे, अद्वैत जोशी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर एसपी सुलतान्स संघाने एसीई हंटर्सचा 24-03 असा सहज पराभव करून धडाकेबाज सुरुवात केली.
डायमंड्स संघाने सोलारिस फायटर्स संघाचा 22-10 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. विजयी संघाकडून केदार देशपांडे, अमित नाटेकर, केदार शहा, अभिषेक ताम्हाणे, ध्रुव मेड, कौस्तुभ शहा यांनी अफलातून कामगिरी बजावली. अन्य लढतीत महाराष्ट्र मंडळ संघाने लॉ चार्जर्स संघावर 24-03 असा विजय मिळवला.
स्पर्धेचे उदघाटन सोलारिस क्लबचे संचालक जयंत पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सोलारिस क्लबचे रवी बांदेकर व मंदार काळे, संतोष साटम, मकरंद जोशी, सुरेश महागांवकर, डेक्कन जिमखानाचे मुकुंद जोशी, अमित पाटणकर आणि राजेंद्र भामरे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
आरपीटीए सोलारिस वि.वि.ओडीएमटी ब 24-04(100अधिक गट: संजीव घोलप/रवी कात्रे वि.वि.उमेश दळवी/राम नायर 6-0; 90अधिक गट: जयंत पवार/हेमंत भोसले वि.वि.ज्ञानेश्वर कारकर/ज्ञानेश्वर जैद 6-1; खुला गट: रवी पांडे/फैजल अन्सारी वि.वि.सिद्धेश्वर वाघमारे/ विशाल जाधव 6-1; खुला गट: सिद्धू बी/अन्वित फाटक वि.वि.राहुल पाटील/राज कपूर 6-2;
डायमंड्स वि.वि.सोलारिस फायटर्स 22-10(100अधिक गट: ध्रुव मेड/हनीफ मेमन पराभूत वि.मनोज पालवे/महेंद्र गोडबोले 4-6; 90अधिक गट: केदार देशपांडे/अमित नाटेकर वि.वि.राजू पिंपळे/सौरभ कारखानीस 6-2; खुला गट: केदार शहा/अभिषेक ताम्हाणे वि.वि. संतोष दळवी/महेंद्र गोडबोले 6-1; खुला गट: ध्रुव मेड/कौस्तुभ शहा वि.वि.राजेंद्र देशमुख/सचिन खिलारे 6-1);
एसपी सुलतान्स वि.वि.एसीई हंटर्स 24-03(100अधिक गट: प्रमोद उमरजे/मंदार मेहेंदळे पराभूत वि.मनीष आर्या/संजय बाबर 0-6; 90अधिक गट: संतोष शहा/आशिष डिके वि.वि.सुरेंद्र देशमुख/दीपक दिसा 6-1; खुला गट: स्वेतल शहा/हरकिरत सिंग वि.वि.दिपक गलगली/लक्ष्मीकांत शोत्री 6-2; खुला गट: मंदार मेहेंदळे/अद्वैत जोशी वि.वि.मयूर कुलकर्णी/आनंद परचुरे 6-0);
महाराष्ट्र मंडळ वि.वि.लॉ चार्जर्स 24-03(100अधिक गट: कमलेश शहा/संजय सेठी वि.वि.नितीन खैरे/नितीन राऊत 6-0; 90अधिक गट:अनिल कोठारी/आर देशमुख वि.वि.संदीप माहेश्वरी/पराग चोपडा 6-1; खुला गट: अभिषेक चव्हाण/रवी कोठारी वि.वि.राहुल मंत्री/समीर बाफना 6-1; खुला गट: अर्पित श्रॉफ/संजय सेठी वि.वि.केतन लुईकर/श्रीनिवास 6-1).