पुणे, 5 सप्टेंबर 2019 : मौसमातील प्रतिष्ठेची अश्वशर्यत असलेल्या अक्कासाहेब महाराज ट्रॉफी शर्यत शनिवारी 7 सप्टेंबर रोजी द रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब मध्ये आयोजित करण्यात आली असून या दर्जेदार शर्यतीमध्ये एकाहून एक सरस अश्वामधील चुरस रेस शौकिकांना पाहायला मिळणार आहे.
अक्कासाहेब महाराज ट्रॉफी हि अश्वशर्यत 7 सप्टेंबर रोजी दुपारी 1.30 वाजता सुरु होणार असून या शर्यतीसाठी पुणेकर शौकिनांचा मोठा प्रतिसाद अपेक्षित आहे. 1977मध्ये कोल्हापूरच्या राजघराण्यातील अक्कासाहेब महाराज यांनी या शर्यतीची सुरुवात केली होती. असा मोठा ऐतिहसिक वारसा असलेल्या या शर्यतीला मोठे महत्व असून यामध्ये 4 वर्षे व त्यापुढील वयाच्या अश्वाचा सहभाग असून 1200 मीटर अंतराची ही रेस असणार आहे.