पुणे- सुहाना प्रविण मसालेवाले व लक्ष स्पोर्टस फाऊंडेशन यांच्या संलग्नतेने आयोजित तिस-या सुहाना लक्ष कॉर्पोरेट महिला बॅडमिंटन अजिंक्यपद २०१७ स्पर्धेत व्हेरीटास ड संघाने टॉमटॉम संघाचा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
मॉडर्न स्पर्टस कॉम्पेक्स्, जंगली महाराज रोड, शिवाजीनगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत संघिक गटात व्हेरीटीस ड संघाने टॉमटॉम संघाचा २-० असा एकतर्फी पराभव करत उपांत्यपुर्व फेरी गाठली. एकेरीत व्हेरीटीस ड संघाच्या श्रीपुर्णा मित्राने टॉमटॉम संघाच्या साई श्रुजना ए.व्ही हीचा २१-८, २१-८ असा सहज पराभव केला. तर दुहेरीत गरिमा शर्मा व श्रीपुर्णा मित्रा यांनी स्नेहा देशपांडे व सायली चौधरी यांचा २१-९, २१-८ असा एकतर्फी पराभव करत संघाला विजय मिळवून दिला.
एकेरी गटात दुस-या फेरीत केपीआयटीच्या गंधाली सोपलने सिटी कॉर्पोरेशनच्या रुची वाहलचा २१-१६, २१-१५ असा पराभव करत आगेकुच केली. ऑलस्टेटच्या बिंदू सिंगने गॅलाघरच्या शाश्वती दत्ताचा २१-१९,२१-१२ असा पराभव केला. अॅमडॉक्स्च्या गायत्री प्रियदर्शनीने व्हेरीटासच्या श्रीपुर्णा मित्राचा २१-१९, ८-२१,२१-१३ असा तीन सेटमध्ये पराभव केला. तर शिखा जोशीने परसिस्टंटच्या रेश्मा लुथ्राचा २१-११, २१-१४ असा पराभव करत आगेकुच केली. टीसीएसच्या राधिनि भांम्रेने गॅलाघरच्या हिमांद्री चावडाचा २१-३, २१-६ असा तर दिती महादेवकरने बीएनवाय मेलनच्या शिल्पा निलेशचा २१-३,२१-३ असा पराभव केला. छेलारामच्या रुचा कुलकर्णीने डीएसटीच्या देवश्री अगरवालच्या २१,१४,२१-१४ असा तर ओरॅकलच्या वर्षा गुप्ताने व्हेरीटासच्या चेतना अगरवालचा २१-८, २१-५ असा पराभव केला. केपीआयटीच्या प्रियांका जोशीने छेलारामच्या निकिता राजपुतचा २१-११, २१-६ असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
स्पर्धचा सविस्तर निकाल– संघिक गट– पहिली फेरी
व्हेरीटीस ड वि.वि टॉमटॉम २-०(एकेरी- श्रीपुर्णा मित्रा वि.वि साई श्रुजना ए.व्ही २१-८, २१-८; दुहेरी- गरिमा शर्मा/श्रीपुर्णा मित्रा वि.वि स्नेहा देशपांडे/सायली चौधरी २१-९, २१-८)
सिटी कॉर्पोरेशन वि.वि व्हेरीटास क २-०(एकेरी- रुची वाहल वि.वि आस्मिका देशमुख २१-७, २१-३; दुहेरी- रुची वाहल/मेघना अस्लेकर वि.वि चेतना अगरवाल/नलिनी डी.ई २१-४, २१-०)
टीसाएस अ वि.वि व्हेरीटास ब २-०(एकेरी- राधिनि भांम्रे वि.वि प्रांजली इंगोले २१-०, २१-१; दुहेरी- राधिनि भांम्रे/धनश्री दाबीर वि.वि पुजा जाधव/प्रांजली इंगोले २१-०, २१-३)
एकेरी गट– दुसरी फेरी
गंधाली सोपल(केपीआयटी) वि.वि रुची वाहल(सिटी कॉर्पोरेशन) २१-१६, २१-१५
बिंदू सिंग(ऑलस्टेट) वि.वि शाश्वती दत्ता(गॅलाघर) २१-१९,२१-१२
गायत्री प्रियदर्शनी(अॅमडॉक्स्) वि.वि श्रीपुर्णा मित्रा(व्हेरीटास) २१-१९, ८-२१,२१-१३
शिखा जोशी(अॅमडॉक्स्) वि.वि रेश्मा लुथ्रा(परसिस्टंट) २१-११, २१-१४
रुचा कुलकर्णी(छेलाराम) वि.वि देवश्री अगरवाल(डीएसटी) २१,१४,२१-१४
राधिनि भांम्रे(टीसीएस) वि.वि हिमांद्री चावडा(गॅलाघर) २१-३, २१-६
वर्षा गुप्ता(ओरॅकल) वि.वि चेतना अगरवाल(व्हेरीटास) २१-८, २१-५
दिती महादेवकर(टीसीएस) वि.वि शिल्पा निलेश(बीएनवाय मेलन) २१-३,२१-३
प्रियांका जोशी(केपीआयटी) वि.वि निकिता राजपुत(छेलाराम) २१-११, २१-६
हर्षनाभुती चौहान(टीसीएस) वि.वि रिचा अहूजा(अॅमडॉक्स्) २१-१६,२१-११
शेफाली शेट्टी(सिटी) वि.वि अंजली अरोरा(परसिस्टंट) २१-१०, २१-१२
मनाली कुलकर्णी(विप्रो) वि.वि दिती महाडीकर(सिमेंस) २१-१, २१-०